पदवीधर आमदार चव्हाण यांचे आत्ताच तोंड पाहुन घ्या, पुन्हा ते आमदार म्हणून दिसणार नाहीत- सचिन निकम

रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सचिन निकम यांना हिंगोली जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद


हिंगोली, दि. २६:- दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० मराठवाडा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन निकम यांच्या प्रचारार्थ हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर,औंढा, वसमत या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सचिन निकम बोलत होते, पदवीधरांचे अनेक प्रश्न आसताना सत्ताधारी पदवीधर आमदार अजगरासारखे झोपलेला आहे,१२ वर्षांपासून १२ कामे देखील पदवीधर आमदारांनी केली नाही अश्या निष्क्रिय लोकांना घरचा रस्ता दाखवीला पाहिजे आशे आवाहन केले, तर काही आपले पक्ष फक्त आंबेडकरी मत दुसर्याच्या घशात घालून आंबेडकर चळवळ संपविण्यासाठी काम करत आहेत आता आंबेडकरी मतदाराने सच्चा कार्यकर्ते ओळखले पाहिजे असेही मत सचीन निकम यांनी व्यक्त केले. तसेच कामगारांच्या व शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या प्रश्नावर आवाज उठवणार असे मत सुनील निकम यांनी व्यक्त केले 

सर्वप्रथम सचिनभाऊच्या हस्ते तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे , जिल्हा नेते राहुल पुंडगे, युवा जिल्हाप्रमुख विकी काशिदे , ॲड. प्रसेनजीत भगत , प्रा.पाईकराव, यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते नितीन खिल्लारे , प्रास्ताविक विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भीमराव इंगोले तर आभार ॲड. संतोष कांबळे यांनी मानले. यावेळी पँथर्स रिपब्लीकन पार्टीचे औरंगाबादचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गुणरत्न सोनावणे , रिपब्लिकन सेनेचे हिंगोली युवा तालुकाप्रमुख अविनाश कांबळे ,अँड. कांबळे, कोथळज सर्कलप्रमुख लखन सरतापे , सुनील ठोके, नरेश रसाळ , कपिल भोकरे , सिद्धू ठोके , संदेश पाईकराव, रमेश कांबळे , लखन खंदारे, इ.कार्यकर्ते उपस्थित होते .तर औंढा शहरात तालुका अध्यक्ष अकाश सुतारे, उपाध्यक्ष विनोद जोगदंड, यशवंतराव साळवे,तसेच वसमतकर यांनी जोरदार स्वागत केले तालुका अध्यक्ष कैलास जोधंळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रंशात हनवते,युवा जिल्हा महासचिव आकाश दातार, युवा जिल्हा उपाध्यक्ष संदिप थोरात, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष धम्मपाल काळे,युवा तालुका अध्यक्ष संदिप एंगडे, युवा तालुका सचिव संदेश पोहरे,उपस्थित होते,यावेळी आंबेडकरी चळवळीतील उमेदवार असल्यामुळे सचिन निकम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना हिंगोली जिल्ह्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळे उपस्थित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने