हिंगोली, दि. १८:- तुम्हाला मुख्यमंत्री कुणी केले? अधिकारीच जर निर्णय घेत असतील तर मग तुमच्या मुख्यमंत्री पदाचा काय फायदा? असा सवाल वंचित बहूजन आघाडीचे प्रमूख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन केला. तसेच ग्राहकानी विज बिलाचे पैसे काढून वेगळे ठेवावेत, मात्र ५० टक्के सूट मिळत नाही तोवर बिलाचा एक रुपयाही भरू नका असा सल्लाही विज वितरण कंपनीच्या ग्राहकाना दिला.
वंचित बहूजन आघाडीचे मराठवाडा पदविधर मतदारसंघातील उमेदवार प्रा. पांचाळ यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर हे आज हिंगोलीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यानी सांगितले की, २००६ साली व्यावसायीक शिक्षण आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने कायदा केला होता. त्यानुसार एससी, एसटी, इतर मागास समाजाला एकूण ५० टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर मराठा समाज आणि आर्थिक दृष्टया मागास समाजाला क्रमश: १६ आणि १० टक्के आरक्षण देण्यात आले. नंतर मात्र राज्य शासनाने एससी, एसटी, इतर मागास समाजाचे ५० टक्के आरक्षण कमी करून ते २५ टक्के एवढे केले. या 'लंगोटी' आणि बेकायदेशिर परिपत्रकामूळे मागास जातींचे २५ टक्के आरक्षण कमी झाले. त्यामूळे हे आरक्ष्ण मराठवाडा पदविधर मतदारसंघाचा विद्यमान आमदार परत आणेल का? आणि त्याने त्यासाठी काही प्रयत्न केले असतील तर त्याचा पुरावा द्यावा, असे आव्हाणही त्यानी दिले. ओबीसी समाजाने धर्मला महत्व द्यायचे की त्यांच्या जिवन जगण्याला याचा शोध घेवून या निवडणूकीत जातीयवादी लोकाना मतदान करायचे की आपल्या ओबीसी प्रतिनिधीला याचा विचार करण्याचे आवाहन त्यानी केले.
विज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय होत असताना, अधिकारी आणि काही मंत्री विरोधी भूमिका घेत असतील तर, तुम्ही मुख्यमंत्री कशाला झालात, तुम्हाला कुणी मुख्यमंत्री कुणी केले? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. तसेच विज ग्राहकांनी जोपर्यंत ५० टक्के सवलत मिळत नाही, तोपर्यंत एक रुपयाही बिल न भरण्याचा सल्ला दिला.
मराठा समाजाला धोका
मराठा समाजाला राज्य सरकारने धोका दिला सुप्रिम कोर्टाने आरक्षणावरील स्टे उठविल्याशिवाय, मराठा समाजाला काहीच लाभ होणार नाही. असे असतानाही राज्य सरकारला जर खरेच या समाजाला आरक्षणाशिवाय सोयी-सुविधांचा लाभ द्यायचा असेल तर त्यानी ओबीसी समाजाच्या धर्तीवर क्रेमीलेअर गट का केले नाहीत? असा सवाल करून त्यानी मराठा आरक्षण आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठीच कोणतेच पावले उचलली नाहीत असा आरोप केला. त्यामूळे मराठा समाजातील गरीबाना धोका बसला आहे.
रिपब्लीकन सेनेच्या उमेदवाराला एबी फॉर्म जोडला का?
पदविधर मतदारसंघ निवडणूकीत वंचित आघाडीच्या उमेदवारासह (बाळासाहेब आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या) रिपब्लीकन सेनेच्या वतीनेही उमेदवार देण्यात आला आहे. त्यामूळे वंचितच्या उमेदवारावर परिणाम होईल का? या प्रश्नावर त्यानी संगितले की, रिपब्लीकन सेनेने त्यांच्या उमेदवाराच्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडला आहे का हे अगोदर पहा. उगाच वाद निर्माण करू नका असे सांगून रिपब्लीकन सेना त्यांचे मोठे नुकसान करील किंवा मतदान खाईल याबद्दल शंका व्यक्त केली.
यावेळी उमेदवार नागोराव पांचाळ, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, जिल्हा महासचिव रविंद्र वाढे, जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर, फारुख अहमद, गोविंद दळवी, वशिम देशमुख, युवा नेते राहुल खिल्लारे, शहराध्यक्ष अतिक रहेमान, योगेश नरवाडे, रुपेश कदम, रतन लोणकर, बबन भुक्तर, सचिन तपासे, आनंद खिल्लारे, ॲड. सतीश पंडीत आदी उपस्थित होते.