बिहारच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यावर नितीश कुमार सक्रिय

मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार कॅबिनेटची पहिली बैठक

पाटणा, दि. १७:- बिहार निवडणुका जिंकल्यानंतर जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या पक्षाची आमदार संख्या कमी असतांनाही सोमवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज मंगळवारी (१७ नोव्हेंबर) नितीश कुमार सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेणार आहेत. 

एनडीएकडे एकूण १२५ आमदार आहेत, जे सरकार स्थापनेच्या संख्याबळापेक्षा केवळ तीननेच अधिक आहेत. अशा परिस्थितीत राज्यात सरकारच्या स्थिरतेसाठी भाजपला हे पद एका अनुभवी नेत्याकडे सोपवावे लागणार आहे.

भाजपकडून नंदकिशोर यादव यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनवले जाऊ शकते. नंदकिशोर यादव यांनी सलग सातव्यांदा पाटणा साहिब विधानसभा जिंकली. नंदकिशोर यादव हे बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या वेळी नितीश कुमार सरकारमध्ये ते रस्ते आणि बांधकाम मंत्रीही होते. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

नितीशकुमार यांच्यासह जेडीयूकडून विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी आणि शीला कुमारी, भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, अमरेंद्र प्रतापसिंह, मंगल पाण्डेय, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा आणि ‘हम’कडून संतोष कुमाल सुमन तसेच मुकेश सहानी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने