हटके: नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरचा थेट मंगळावर सेल्फी

धुळीने माखलेला फोटो नंतर डिलीट करणार नसल्याचं मिश्किल ट्विट

वॉशिंग्टन, दि. २२:- धुळीने माखलेला फोटो नंतर डिलीट करणार नाही, असे म्हणत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरने (रोबोट) मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी खोदकाम करताना आपला सेल्फी काढला. यात हा रोबोट मंगळावरील एका ठिकाणचे नमुने गोळा करताना खोदकाम करताना धुळीने माखलेल्या स्थितीत दिसत आहे.

याबाबत नासा आणि क्युरॉसिटी रोव्हरने दिलेल्या माहितीनुसार, हे रोबोट मंगळावरील विविध ठिकाणी जाऊन तेथील मातीचे नमुने गोळ करत आहे. क्युरॉसिटी रोव्हरचा हा सेल्फी मंगळावरील ‘मेरी ॲनिंग’ या ठिकाणाचा आहे. (NASA Curiosity Rover clicks new Dust covered selfie on Mars during mission).
क्युरॉसिटी रोव्हर मंगळावरील या भागात जुलै २०२० पासून काम करत आहे. हा रोबोट या भागातील विविध ठिकाणी जाऊन तेथील मातीचे विविध खोलीवरील नमुने गोळा करतो आणि त्यात काही जीवाष्माचा अंश सापडतो का हे तपासत आहे. हे सर्व मंगळावरील जीवसृष्टीच्या संशोधनासाठी सुरु असलेल्या मोहिमेचा भाग आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, नुकताच क्युरॉसिटी रोव्हरने पाठवलेला सेल्फी ५९ फोटोंना इमेज स्पेशालिस्टने एकत्र करुन तयार झालेला आहे. हा सेल्फी २५ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला. क्युरॉसिटी रोव्हरचा हा मंगळावरील २ हजार ९२२ वा दिवस आहे.

क्युरॉसिटी रोव्हर नोव्हेंबर २०११ मध्ये लाँच करण्यात आले होते. हा रोबोट ऑगस्ट २०१२ मध्ये मंगळावर लँड झाला. तेव्हापासून क्युरॉसिटी रोव्हर मंगळावर जीवसृष्टीचा अंश शोधण्याच्या मोहिमेवर आहे. सध्या हा रोबोट मंगळावरील मेरी ॲनिंग या भागातील नमुने गोळ करत आहे. या ठिकाणी या रोबोटने आपल्या ड्रिल आणि रोबोटिक हातांनी तीन खड्डे केले आहेत. यातून वेगवेगळे नमुने गोळ करत त्याची चाचणी सुरु आहे.

मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घेत आहे. असे काही पुरावे आढळून आल्यास पृथ्वीशिवाय विश्वामध्ये इतर ठिकाणी सुद्धा जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही हे स्पष्ट होणार असून तसे पुरावे मिळाल्यास भविष्यात इतर ग्रहांवर जीवसृष्टी स्थापन करता येईल की नाही हे सुद्धा या मोहिमेमुळे स्पष्ट होणार आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने