कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई कायदेशीर की बेकायदेशीर?

उच्च न्यायालय 26 नोव्हेंबर रोजी देणार निकाल; अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयात बीएमसीने केली होती कारवाई

मुंबई, दि. 23:- अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयात बीएमसीने केलेली कारवाई ही कायदेशीर होती की बेकायदेशीर होती? याचं उत्तर आता 26 नोव्हेंबरला मिळणार आहे. कारण, या प्रकरणी 26 तारखेला निर्णय देणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं जाहीर केलं आहे. या प्रकरणानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. (kangana ranaut bmc bungalow demolition case high court will announce judgment on 26th november)

बीएमसीने 9 सप्टेंबर रोजी बेकायदा बांधकामाचं कारण देत कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर त्याच दिवशी कारवाई थांबवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) बीएमसीला दिले होते. इतकंच नाही तर कंगनाने अनेक घोटाळे केले असल्याचा आरोप 10 सप्टेंबर रोजी बीएमसीने केला होता. या वादंगात शिवसेनेवरही टीका करण्यात आली होती.

बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी बीएमसीला नोटीस बजावत आपल्या कार्यालयात बीएमसी तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 2 कोटींची मागणी केली होती. यावर बीएमसीकडूनही उत्तर देण्यात आलं होतं. कंगनाने नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कार्यालय उभारल्याचं यावेळी पालिकेनं म्हटलं होतं. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला आज (23 नोव्हेंबर) वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, यावेळीही कंगना अनुपस्थितीत राहिली आहे. तर, या प्रकरणी आता कंगना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावत, वांद्रे पोलीस स्टेशनमधील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स (Third Summons) बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, आताही कंगना अनुपस्थितीत राहिल्याने तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. (kangana ranaut bmc bungalow demolition case high court will announce judgment on 26th november).  अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post