हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसानंतर कोविडचे एका दिवसात 20 पेक्षा जास्त रुग्ण

दुसऱ्या लाटेची भीती; सतर्क राहण्याची गरज.....

हिंगोली, दि. 26:- जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड ॲन्टिजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती आणि कळमनुरी परिसर 09 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज 01 कोविड-19 रुग्ण बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे. तर 01 कोव्हिड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभिर असल्यामूळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकून 09 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 306 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 201 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 53 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post