Financial Assistance: मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य

हिंगोली, दि. ३०:- कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील ३० वर्षीय शेतकरी सचिन मिरासे पाटील हे शेतात ट्रॅक्टरद्वारे काम करीत असताना ट्रॅक्टर विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना होऊ नये, त्यांच्या किमान गरजा भागवण्यासाठी मदत व्हावी यासाठी द ग्रेट मराठा व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने सचिन मिराशे यांच्या कुटुंबियांना ३२ हजार २०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. (The Great Maratha WhatsApp Group extended financial assistance of Rs. 32,200 to the family of deceased young farmer in Kalamanuri tehsil)
सचिन मिरासे हे मराठा समाजासाठी कार्य करणारे तरुण कार्यकर्ते होते. शेतात काम करीत असताना ते चालवत असलेले ट्रॅक्टर यांच्या शेतातील विहिरीत पडल्यामुळे त्यांचा त्या घटनेत मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचा मृत्यू सुद्धा विहिरीत पडून झाला आहे. घरातील कर्ते पुरुष गेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मिराशे कुटुंबीयांना "द ग्रेट मराठा व्हाट्सअप ग्रुप"चे ॲडमिन गजानन निर्मले आणि ग्रुपमधील सदस्यांच्या वतीने वर्गणी करून ३२ हजार २०० रुपये जमा करण्यात आले (The great Maratha WhatsApp Group admin and members collect money for financial assistance).

ही रक्कम आज ३० नोव्हेंबर २०२० रोजी मराठा शिवसैनिक सेनेचे प्रमुख विनायक भिसे, गजानन निर्मले ॲड. वैभव शिंदे, शुभम राजे, शेख सादेक, सोनू डांगे आदींच्या उपस्थितीत सचिन मिराशे यांच्या कुटुंबीयांना धनादेश स्वरूपात देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (The financial assistance was handed over to the family members by Maratha Shivsainik Sena chief Vinayak Bhise and others).

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने