खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला २५ हजाराची मदत

हिंगोली, दि. २७:- जिल्ह्यातील औंढा (ना.) तालुक्यातील असोला येथील शेतकऱ्याचा बैल वीज पडून ठार झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळण्यास विलंब होत असताना खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला २५ हजाराचा धनादेश देऊन मदत मिळवून देण्यात आली.


वीज पडून ठार झालेल्या पशुधनांची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते, जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे वीज आणि वादळी वाऱ्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.वीज पडून पशुधन हानी झाल्यास राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. औंढा (ना) तालुक्यातील असोला तर्फे लाख येथील शेतकरी भगवान गारोळे यांच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला होता,याबाबत त्यांनी औंढा तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. तक्रार दाखल होऊनही कोणीच दखल घेत नसल्याने शेतकरी गारोळे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले यावर खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने कारवाई करत औंढा तहसील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, तहसीलदार यांना संपर्क करून सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांनतर प्रकरण मार्गी लागले सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि पंचनामा झाल्यानंतर अखेर खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला, आणि २५ हजाराचा धनादेश थेट शेतकऱ्याला मिळवून देण्यात आला. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल असताना शासनाच्या मदतीशिवाय पर्याय उरला नसून ,त्यातही शासन मदत मिळण्यास विलंब होत होता. याकामी औंढा नागनाथचे तहसिलदार कृष्णा कानगुले, नायब तहसिलदार वैजनाथ भालेराव, खासदार हेमंत पाटील यांचे कळमनुरी -औंढा विधानसभा क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक ,पोलीस पाटील तुकाराम दळवे,तलाठी प्रल्हाद चट्टे ,भानुदास कऱ्हाळे यांनी सहकार्य केले. खासदार हेमंत पाटील यांच्यामुळेच मला नुकसान भरपाई मिळू शकली याबाबत शेतकरी गारोळे यांनी आभार मानून ऋण व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post