खून झालेल्या तरुणाच्या पत्नीचा मृतदेह आढळला....

हिंगोली, दि. २२:- येथील कमलानगर भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना २३ दिवसांपूर्वी घडली होती. याच तरुणाच्या पत्नीचा आज गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता मधुकर लोणकर (२०) असे मयताचे नाव आहे. मयताचा पती वैभव जयचंद वाठोरे (२१) रा. शिंदेफळ ता. जि. हिंगोली, ह. मू. कमलानगर याच्याशी तिचा १७ जून २०१९ रोजी प्रेमविवाह झाला होता. या प्रेम प्रकरणातून वैभववर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. तर वैभव वाठोरे याचा दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री खून झाला होता. ०२ नोव्हेंबर २०२० रोजी नर्सी नामदेव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांगेफळ येथील हरिश्चंद्र रामप्रसाद शिंदे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत खूनाचा गुन्हा नरसी नामदेव पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.


तर आज दुपारी ४ वाजता पत्नी निकिता हिचा मृतदेह देवुळगाव रामा येथे शेत शिवारात लिंबाच्या झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पतीच्या खुनानंतर एका महिन्याच्या आतच पत्नीचा मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी याबाबत, अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास झाल्यावर तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला है स्पष्ट होणार आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post