रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सचिन निकम यांना आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा जाहीर

हिंगोली, दि. ३० (बिभिषण जोशी):- आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचे औरंगाबाद-५ पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सचिन निकम यांना आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. (Ambedkarite Party of India gives unconditional support to Republican Sena candidate Sachin Nikam for Aurangabad Marathwada Graduates Constituency election dated December 1, 2020)
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष धीमान विजय मानकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचा मोठा समर्थक वर्ग महाराष्ट्रभर आहे. (API Chief Dhiman Vijay Mankar the most intellectual political leader of India) पक्षाच्यावतीने औरंगाबाद-५ मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी स्वतंत्र उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेश सहसचिव चंद्रप्रकाश शिंदे आणि मराठवाडा प्रभारी नामदेवराव इंगळे यांनी केलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन निकम यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

याबाबत आज आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धिमान ॲड. रावण धाबे यांनी पाठिंब्याचे पत्र रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांना दिले. यावेळी जिल्हा नेते राहुल पुंडगे, एपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष धिमान ॲड. मारोती सोनुले, एपीआयचे जिल्हा सरचिटणीस धिमान रवी शिखरे पाटील, औंढा तालुका अध्यक्ष अकाश सुतारे, युवा शहराध्यक्ष नितीन गव्हाणे, ॲड. संतोष कांबळे, तालुका उपाध्यक्ष सुनील ठोके, युवा नेते किशोर वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या