हिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान

हिंगोली, दि. १९:- येथील आदर्श महाविद्यालयातील बीएससी विद्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने स्टीफन हॉकिंग यांच्या हॉकिंग रेडिएशन या सिद्धांताला आव्हान दिले असून किरण कल्याणकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. किरणचा शोध निबंध इपीआरए इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या वैज्ञानिक शोध आणि प्रबंध संबंधीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.
मूळचा औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील रहिवासी असलेला किरण गणेश कल्याणकर या विद्यार्थ्यांना बालपणापासूनच संशोधन क्षेत्रांमध्ये आवड निर्माण झाली आहे. त्याने यापूर्वी सुद्धा प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या शोधनिबंधावर कॉमेंट्री असलेले शोध निबंध लिहिले आहेत. किरण कल्याणकर लिहिलेला " थेरम डीसप्रूफ ऑफ हॉकिंग रेडिएशन विथ हेल्प ऑफ क्वांटम टनेलिंग " हा शोध निबंध लिहिला असून या निबंधद्वारे किरण कल्याणकर याने स्टीफन हॉकिंग यांच्या रेडिएशन थिअरीला विरोध केला आहे. हॉकिंग यांच्या मतानुसार ब्लॅकहोल मधून रेडिएशन उत्सर्जित होत असतात, ऊर्जा उत्सर्जित होत असते. परंतु किरण कल्याणकर याच्या मतानुसार त्यामधून कोणतीही ऊर्जा उत्सर्जित होत नाही. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कल्याणकर याने विविध गणितीय सूत्रे, वैज्ञानिक सूत्रे सुद्धा शोधनिबंधात दिली आहेत. किरण कल्याण कल्याण लिहिलेल्या या शोध निबंध बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवश्य पहा....
किरण कल्याणकर यांची मुलाखत
हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे संशोधन करणाऱ्या किरण कल्याणकर याची रावण धाबे यांनी घेतलेली मुलाखत पाहण्यासाठी वरील 👆👆 लिंक क्लिक करा.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

1 टिप्पण्या

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने