हिंगोली दि. २६:- येथील ऐतिहासिक दसरा उत्सवामध्ये २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ चे सुमारास कयाधू नदीकाठावरील खाकीबाबा मठ परिसरात रावण दहन कार्यक्रम पार पडला (Ramlila at Khakibaba mutt on the bank of Kayadhu River). साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमास रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. (Dussehara in simple way celebrated in Hingoli)
कोरोना साथरोग आणि लॉकडाऊनमुळे या वर्षी दसरा आणि दुर्गा महोत्सव इतर सण समारंभा प्रमाणेच अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. प्रशासनाने केवळ ४ फूट उंचीच्या मूर्तींची स्थापना करण्यास परवानगी दिल्यामुळे सर्वत्र ४ फूट एवढ्या उंचीचे दुर्गादेवी आणि इतर देव देवतांचे प्रतीकात्मक पुतळे स्थापन करण्यात आले होते. हिंगोली येथील दसरा महोत्सव सुमारे १६५ वर्षे जुना आहे. या दसऱ्याला ऐतिहासिक परंपरा असल्यामुळे महोत्सव पाहण्यासाठी जिल्हाभरातील भाविक येतात. याशिवाय जिल्ह्याच्या बाहेरील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. परंतु यावर्षी लॉकडाऊन आणि कोरोना साथीमुळे मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (Historical Dasara Festival at Hingoli) या कार्यक्रमाला सुमारे २०० नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये पोलिसांचीच संख्या लागली होती.
Tags:
Breaking
Dussehara
Hingoli Dasara Festival
Raavan Dahan
Raavan Dahan In Simple Way
Rama-Raavan War
Ramayan