विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांचा नुकसान पाहणी दौरा

वसमत:- तालुक्यातील आडगाव, जवळा बाजार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगोली दौऱ्यावर असताना आडगाव रंजे परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
छाया:- नागेश चव्हाण.
यामध्ये वैजनाथ आप्पा वैराट व सल्लाउद्दीन सिद्दीकी, आजय देशमुख, सखाराम नेमाडे यांच्या थेट बांधावर जाऊन सोयाबीन व कपाशी पिकाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घेतल्या यावेळी बँकांनी कर्ज साठी शेतकऱ्यांकडे तगादा न लावण्याचे सांगितले.कुठे तरी सरकारला जागे होण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले सरकार मध्ये फक्त माइक घेऊन बोलणारच मंत्री आहेत असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला फक्त टोलवाटोलवी सुरू असल्याचा हल्लाबोल हे या वेळी करण्यात आला हा शेतकऱ्यांचा आक्रोश माननीय मुख्यमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे व तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली व तालुक्यातील तहसीलदारांकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे न केल्याचे सांगितले तसेच दिवाळी तोंडावर असताना कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात आली पालकमंत्री फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना संताप असल्याचे निदर्शनास आणून दिले काही शेतकऱ्यांनी विरोधी पक्ष नेत्यांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली यावेळी धीर सोडू नका आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत एकमेकांना सांभाळून घेऊ असं फडणीस यांनी सांगितले.

यावेळी पिक विमा भेटण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे फडणवीस यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, यांच्यासह कार्यकर्ते व श्रीकांतनाना देशपांडे, उज्वलाताई तांबाळे, शिवदास, बोडडेवार, खोब्राजी नरवाडे, बालाजीराव जाधव, प्रभाकर रेंगे, नाथराव कदम, विजय नरवाडे, विश्वनाथ देशमुख, नंदकुमार मोहटेपाटील ,विश्वनाथ धोसे ,शिवाजी अडलींगे ,सिताराम म्यानेवार,साईनाथ चव्हाण, शिवाजी , माधवराव भालेराव, सिताराम म्यानेवार, शिवाजी आडलींगे उपस्थित होते

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने