वसमतमध्ये दसरा कोरोनामुळे साधेपणाने केला साजरा

वसमत, दि. २६:- येथील दसरा प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सव रद्द करावा लागला. गावातील मुख्य आकर्षण असलेल्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची उंची देखील कमी केली होती.
छाया:- नागेश चव्हाण, वसमत.
वसमत येथील दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहेत. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सव रद्द करावा लागला. त्यामुळे गावातील मुख्य आकर्षण असलेल्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची उंची देखील कमी केली होती. गतवर्षी ५१ फुटी राहणारा प्रतिकात्मक पुतळा यंदा केवळ १० फूट करण्यात आला होता. यावर्षी दसरा महोत्सव साध्या पद्धतीने पार पडला. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्यात आली.

वसमत तालुक्यातिल वैभव असलेला सार्वजनिक दसरा महोत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा राहतो. यातील मुख्य आकर्षण असलेला क्षण म्हणजे रावण दहन, हा क्षण पाहण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून लोक आवर्जून येतात. त्यामुळे येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा महोत्सव रद्द केला. त्यामुळे प्रत्येकांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. ह्या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी भेट दिली. कार्यक्रमासाठी आमदार राजुभैया नवघरे पाटील, माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावक, माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा, नगराध्यक्ष श्रीनीवास पोराजवार, उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार, माजी नगराध्यक्ष आब्दुल हाफीज आब्दुल रहेमान, डॉ. मारोती क्यातमवार, सुनील काळे, शामीम सिद्धीकी, मुख्याधीकारा अशोक साबळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय उपस्थित होत. तर या कार्यक्रमाचे संचलन शिवाजी आडलींगे, काशिनाथ भोसले, सोनू वाघमारे, धीरज कुलथे, विलास नरवाडे प. स. उपसभापती विजय अण्णा नरवाडे, सुभाषशेट लालपोतू यांनी केले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने