धनवान रणबावळे यांनी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्यामुळे सत्कार

सेनगाव/बबन सुतार, दि.२९:- येथील डॉ. माधव रणबावळे यांचे चिरंजीव धनवान रणबावळे यांनी मागील झालेल्या नीट वैद्यकीय परीक्षेत 720 पैकी 515 मार्क घेऊन घवघवीत यश संपादित केल्याने बहुजन टायगर क्रांती सेना या सामाजिक संघटनेकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 
नुकत्यात राज्यात नीट वैद्यकीय परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून या परीक्षेत सेनगाव येथील मातंग समाजातील विद्यार्थी धनवान माधवराव रणबावळे या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत 720मार्क पैकी 515 मार्क घेऊन त्यांनी यशाचे शिखर गाठले असून भावी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न सुकर केले आहे या तरुणाने नीट वैद्यकीय परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्यामुळे बहुजन टायगर क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ उफाडे व तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष सत्काराचे आयोजन करून त्यांचा निवासस्थानी जंगी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ उफाडे बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सुतारे जिल्हा उपाध्यक्ष संदेश शिखरे युवा जिल्हाध्यक्ष चेतन पाटोळे युवा जिल्हा सचिव विकास गायकवाड विद्यार्थी वडील डॉ. माधव रणबावळे आई संगीताबाई रणबावळे आजी सुभद्राबाई रणबावळे पत्रकार बबन सुतार युवा समाजसेवक ओमेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती हा सत्कार समारंभ पार पाडला वेळी धनवान रणबावळे यांना पुढील भावी कार्य काळासाठी बहुजन टायगर क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आला. 

गोर गरीबाची रुग्णसेवा हेच ध्येय:- धनवान रणबावळे

सेनगाव येथील रहिवासी असलेले धनवान रणबावळे यांनी नुकत्यात पार पडलेल्या नीट वैद्यकीय परीक्षेत 720 मार्क पैकी 515 मार्क संपादित करून भावी जीवनात सर्जन होण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे अंगामी भावी काळात गोरगरिबांची रुग्णसेवा हेच माझे ध्येय असल्याचे मत धनवान रणबावळे यांनी व्यक्त केले आणि भावी आरोग्य शिक्षक पूर्ण करून सर्जन करण्याचा माझा मानस असून मी गोरगरीब कष्टकरी व मजूर वर्गाचे आरोग्यासंबंधी विशेष काळजी घेणार असून त्यांना माझ्या भावी आरोग्य शिक्षण यांचा फायदा मी नक्कीच वंचित घटकांना देणार असल्याची माहिती नीट वैद्यकीय परीक्षेत यश संपादित केलेले तरुण धनवान रणबावळे यांनी बोलून दाखवले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने