विज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण

वसमत तालुक्यातील किन्होळा येथील घटना

वसमत/योगिता काचगुंडे, दि. २८:- दिवसेंदिवस वीज चोरीच्या घटनेत एवढी वाढ झाली आहे की, हे चोरटे अजिबात महावितरण विभागाच्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास घाबरत नसल्याचे दिसून येत असून अशाच एका घटनेत वसमत तालुक्यातील किन्होळा येथे महावीतरण कंपनीच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञासह इतर कर्माचाऱ्याना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात बाप लेकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, मेनाजी कानोरे आणि त्याचा मुलगा अमित मेनाजी कानोरे अशी आरोपींची नावे आहे. फिर्यादी असलेले विज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजू आवटे त्यांच्यासह कनिष्ठ अभियंता जीवन राठोड आणि कर्मचारी विशाल पांडुरंग खंदारे, योगेश गंगाधर आवटे, हनुमंत संगेपाड, संदीप मधुकरराव इंगोले, प्रवीणकुमार उत्तम चव्हाण, श्रीराम महाजन येरवाड, अनिल सुभाषराव अवकळे, विनोद चंदर वाघमारे यांचे पथक विज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी किन्होळा येथे गेले होते. गिरगाव येथील महावितरण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजू विठ्ठल आवटे, कनिष्ठ अभियंता राठोड आणि सोबत असलेले कर्माचारी अवकाळे अंनी वाघमारे हे विज चोरीचे अकोडे काढत असताना गावातील मेनाजी कानोरे हा त्यांना म्हणाला की माझा काढलेला आकोडा जशास तसा पुन्हा टाकून दे, नाहीतर मारहाण करून गावातून काढून देईन. त्यानंतर त्याचा मुलगा अमित मेनाजी कानोरे आणि मेनाजी यांनी फिर्यादिला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, २८४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post