आंबेडकराईट पार्टीच्या उपाध्यक्षपदी ॲड. सोनुले, युवक अध्यक्षपदी निशांत राऊत

हिंगोली दि. १९- येथील आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी ॲड. मारुती सोनुले तर युवक जिल्हाध्यक्ष पदी निशांत राऊत यांची दिनांक १८ रोजी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धीमान ॲड. रावण धाबे, जिल्हा महासचिव धीमान रवी पाटील धीमान ॲड. संतोष चाटसे, अनिल कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी आंबेडकराईट पार्टीच्या वतीने दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी बोलताना नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्षसंघटनेत संघटनात्मक काम करण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने