टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे "वाघापासुन वाचवा आंदोलन"

शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली झाले आंदोलन

डीएम रिपोर्ट्स/यवतमाळ-  यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघोबा लगतच्या ८२ गावामध्ये दररोज दर्शन देत असल्याने आज अभयारण्यात शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली "वाघापासून वाचवा आंदोलन" करण्यात आले. यावेळी वाघाच्या दहशतीत जगत असलेल्या ग्रामस्थांनी वन विभागाच्या निष्क्रियपणावर चांगलाच संताप व्यक्त केला.
 
टिप्पेश्वर अभयारण्य लगतच्या सुमारे ८२ गावामध्ये दररोज वाघांचे सहज दर्शन होत असून या भागात  कोपामांडवी, आंतरवाडी, कोबाई, सुन्ना, सुसरी, पेंढरी, अर्ली, घुबडी, भीमकुंड, सावरगाव, गाव मंगी, सगदा, सावंगी, गणेरी, दर्यापूर, रामपूर, कोदोरी, जाम, भाड, उमरी, टिटवी, बोथ, लिंगटी, बहात्तर येथील सुमारे ४० हजारावर शेतकरी शेतमजूर राहतात. 

या ग्रामस्थांचे शेकडो गाई बैल, बकऱ्या वाघांच्या भक्षक झाले असून यावर्षी वाघ व मनुष्य हा संघर्ष प्रचंड वाढला आहे. कोपामांडवी, आंतरवाडी, कोबाई परीसरात वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर आदीवासी प्रचंड भडकले असल्यामुळे मागच्या महीन्यात १८ निरपराथ आदीवासी महीला व नागरीकांवर पोलीसांनी एकतर्फी कारवाई करून खटले सुद्धा असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याजवळ नागरीकांनी केला.  तेंव्हा त्यांनी टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे "वाघापासुन वाचवा आंदोलन" याची माहिती नितीन काकोडकर प्रधान वन संरक्षक अभयारण्य दिली. मात्र जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होत नाही आम्ही आंदोलन घेणार नाहीत. असा निर्धार कोपामांडवी आंतरवाडी कोबाई सुन्ना सुसरी पेंढरी अर्ली घुबडी भीमकुंड सावरगाव गाव मंगी सगदा सावंगी भीमकुंड गणेरी दर्यापूर रामपूर कोदोरी जाम भाड उमरी टिटवी बोथ लिंगटी बहात्तर येथील सुमारे ४० हजारावर शेतकरी शेतमजूर सहभाग घेतला. 

शेतकरी नेते हणमंतु किष्टू कायपेल्लीवर ( सरपंच) कोपामांडवी यावेळी सांगितले की अख्या टिप्पेश्वर अभयारण्य वन खात्याचा दुर्लक्षामुळे संपूर्ण नसले असुन आता मध्ये गवत चारा नसल्यामुळे व सर्वीकडे तरोटा व काटेरी विषारी झाडे वाढल्यामुळे सर्व हरीण रोही डुकर इतर वाघांचे भक्षक बाहेर आल्यामुळे आता सर्वच वाघ आमचे बैल गाई व बकऱ्या खात आहेत मात्र आता ते शेतात येऊन हल्ले सुद्धा करीत आहेत . 

आजच्या आंदोलनात आंतरवाडी जेंव्हा किशोर तिवारी यांनी भेट दिली त्यावेळी वाघ एका शेतात बसला होता तर टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे उपोषण चालू होते त्याच वेळी दूर वन कर्मचारी सुद्धा उभे होते मात्र एकही अधिकारी लिहेपर्यंत आला नव्हता या आंदोलनात विकास मोहन क्षीरसागर भुजंग पांडू मेश्राम संजय भुमंना पडगंतीवर अनिल येरमे अशोक गणपत कोरचे प्रलाड वाघ धूर्वे पांडुरंग सूर्यभान आत्राम रामकिसन बापूराव आत्राम लालू भुरू टेकम गजू रामजी मेश्राम कृष्णा नागोराव कणांके लींगा किसन गेडाम नयन घोडे चंद्र मसराम व्यंकटेश दादांजे सुरेश दाडांजे निलेश तोडसाम महादेव सिदाम रवींद्र मेश्राम यादव तोडसाम कैलास टेकाम महादेव मेश्राम लिंगा पांडू मेश्राम इंद्रा भुसन अनाके विनोद मसराम कोल्हे मनोहर कोर्वते रामराव वेट्टी संजू कोवे बळीराम उके श्रीदन दडांजे भीमराव डदांजे झित्रुजी मेश्राम भास्कर कुमरे भास्कर तोडसाम यांनी सहभाग घेतला.  

आपण लवकरच टिप्पेश्वर अभयारण्य वन खात्याचा दुर्लक्षामुळे संपूर्ण नसले असुन आता मध्ये गवत चारा नसल्यामुळे व सर्वीकडे तरोटा व काटेरी विषारी झाडे वाढल्यामुळे सर्व हरीण रोही डुकर इतर वाघांचे भक्षक बाहेर आल्यामुळे आता सर्वच वाघ आमचे बैल गाई व बकऱ्या खात हा गंभीर मुद्दा असल्याचा मुख्यमंत्र्याच्या दरबारात नेणार असुन लवकरच खाबू अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन तिवारी यांनी यावेळी दिले मात्र या कोपामांडवी आंतरवाडी कोबाई सुन्ना सुसरी पेंढरी अर्ली घुबडी भीमकुंड सावरगाव गाव मंगी सगदा सावंगी भीमकुंड गणेरी दर्यापूर रामपूर कोदोरी जाम भाड उमरी टिटवी बोथ लिंगटी बहात्तर येथील सुमारे ४० हजारावर शेतकरी शेतमजूर असंतोष भडकणार असा इशारा आदिवासी नेते अंकित नैताम यांनी यावेळी दिला.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने