डीएम रिपोर्ट्स/शिवशंकर निरगुडे- वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश याबाबतचा विभागवार आरक्षणाचा ७०:३० चा फार्मूला रद्द करण्याची मागणी राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी राज्याचे वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
याबाबत खासदार राजीव सातव यांनी ३० ऑगस्ट रोजी मंत्री अमित देशमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार ७०:३० चा फार्मूला हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून ज्या विद्यार्थ्यांकडे पात्रता आहे अशांना सर्वच ठिकाणी राज्यभरात त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणे गरजेचे आहे. नवीन फार्मूला नुसार विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे नवीन वैद्यकीय प्रवेशाचे शिक्षण धोरण रद्द करण्याची मागणी सुद्धा खासदार सातव यांनी केली आहे.