कंगणाला मुंबईत न फिरू देण्याचा शिवसेनेचा इशारा, तर मंत्री रामदास आठवले यांनी केली कंगणाला संरक्षण देण्याची घोषणा

कंगणा रनौतवरुन महाराष्ट्रात राजकीय वादंग......

डीएम रिपोर्ट्स- हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री कंगणा राणावत (रनौत) हिने केलेल्या 'मुंबई शहर पाकव्याप्त काश्मीर असल्याचे भासत आहे'  या ट्विटमूळे महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे.  कंगणा  रनौत हिच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा शिवसेना आणि मनसेनेसह अनेक पक्षांनी तीव्र शब्दात निषेध केला असला तरी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या" नावाखाली तिला समर्थन दिले असल्याने महाराष्ट्राचे राजकरण चांगलेच गरमले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यातील राजकीय वातावरण टाईट झाले आहे. सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झालेले असतांनाही, काही मीडियावाले या प्रकरणाला राजकीय वळण देत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार, सुशांतसिंग याच्या कथित मारेकर्‍यांना कसे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे? राज्याचे मंत्री तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंग याचा खून करण्यासाठी कसा हातभार लागला? रिया चक्रवर्ती कशी खूनी आहे? हे कोणतेही ठोस पुरावे नसताना दाखविले जात आहे. त्यातही रिपब्लिक नावाच्या टीव्हीवर तर सुपारी छाप पत्रकार अर्णब गोस्वामी याने पत्रकारितेचे होते नव्हते सर्व मूल्य मारून टाकून आटापिटा सुरू केला आहे.

असाच आटापिटा बॉलीवूडमधील काही भाजप धारजिणे नट-नट्या करीत असून त्यांनी महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी समाज माध्यमांवर बेछूट आरोप करण्याचा सपाटा लावला आहे. याच वादाला आता मोठे राजकीय वळण लागले आहे. मीडियावाले कट्टर हिंदुत्ववादी कृतीमुळे पाठ थोपट्यात असल्याने, कंगणा रनौत या अभिनेत्री बाईने थेट मुंबईवर 'मुंबई शहर पाकव्याप्त काश्मीर असल्याचे भासत आहे' अशी टीका केली. आणि त्यामुळेच आता, महाराष्ट्रात राजकीय वादंग सुरू झाले आहे.
"मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र"
या शब्दांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांनी या अभिनेत्री-कम-हिंदूराष्ट्रवादी कार्यकर्ती बाईवर टीका केली आहे.
तर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, सर्वांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी कंगणाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खलील भाषेत समर्थन केले आहे. 

"लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल."
भाजपचे राम कदम यांनी तर या अभिनेत्रीला "झांसीची राणी' अशी उपाधीच दिली आहे. ती झांसीची राणी असल्याने महाराष्ट्रातील विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या धमक्यांना घाबरत नसल्याने सांगितले असून, तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. या अभिनेत्रीच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी भाजप आणि मित्र पक्षांनी तिचे समर्थन केल्याने राजकारण किती खालच्या पातळीचे करण्यात येत आहे, हेच दिसून येत आहे. तर कंगणा हिने वापरलेली भाषा शाहरुख किंवा सलमान सारख्या मुस्लिम अभिनेत्याने वापरली असती तर संघ परिवार आणि भाजपवाले मूग गिळून बसले का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने