हिंगोली येथे १७ लाख ४७ हजाराच्या बनावट नोटांसह २४ लाखाचा ऐवज पोलिसांकडून जप्त

डीएम रिपोर्ट्स- हिंगोली शहरातील आनंदनगर अकोला बायपास भागातील एक पुरुष आणि महिला बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने आणि दहशत वरोधी पथकाचे ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी १७ लाख ४७ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि इतर मुद्दे माणसाचा एकूण २४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत एका आरोपीला अटक करण्यात आली असून महिला आरोपी फरार आहे.

याबाबत हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला बायपास भागातील आनंदनगर येथे काही जण बनावट नोटा आणि सोन्याचे बनावट दागिने मूर्ती तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून हिंगोली येथील शहर शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा दहशतवाद विरोधी पक्षाचे प्रमुख उमाकांत चिंचोलकर यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता आरोपी भाड्याने राहत असलेल्या अरुण हनवते यांच्या घरी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी १७ लाख ४७ हजार ३५० रुपये एवढ्या किमतीच्या बनावट नोटा आणि महालक्ष्मीच्या बनावट सोन्याच्या १३ पितळी मुर्त्या आणि नोटा तयार करण्याचे साहित्य, एक कार असा एकूण तब्बल २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणातील आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी देशमुख याला अटक करण्यात आली असून महिला आरोपी छायाबाई गुलाबराव भुक्तार ही फरार आहे. या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रामेश्वर वैंजने, एपीआय चिंचोलकर यांच्यासह रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडगण, वसंत चव्हाण, अशा केंद्रे, आणि दहशतवाद विरोधी कक्षाचे विजय घुगे यांनी सहभाग नोंदविला

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने