अमेरिकेच्या भरोश्यावर आमच्याशी पंगा महाग पडेल.... चीनची धमकी

डीएम रिपोर्ट्स- दोन महिन्यापूर्वी झालेल्या लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षनानंतर भारत आणि चीनमध्ये  निर्माण झालेल्या तनावानंतर चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आता पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी  हाणून पाडल्यानंतर चीनने भारताला आपले सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून भारताला धमकी दिली असून चिनसोबत लढताना अमेरिका मदतीसाठी येईल या भ्रमात न राहण्याचा इशारा दिला आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये भारताने घुसखोरीबाबत स्वत:च पुढाकार घेतला आणि त्यामुळे तणाव निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भारत अंतर्गत राजकीय वादावादी आणि इतर प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी असल्या कुरपती करीत असल्याचा आरोप केला. तर याच आरोपांच्या फैरीनंतर भारताने सोमवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळून लावल्यावर चिनच्या सैन्य प्रवक्त्याने भारताने अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडली असल्याचा आरोप करून सैन्य माघारी घेण्याचे सुचविले होते.

तर रात्री ११.१० वाजता चीनच्या 'ग्लोबल टाइम्स' या सरकारी वृत्तपत्राने भारताला इशारा दिला आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की
"चीन भारतापेक्षा कित्येक पट्टीने शक्तीशाली आहे, आणि चीनसोबत भारताची तुलनाच होवू शकत नाही. आम्ही भारताला बजावतो की अमेरिकेसारख्या इतर शक्तींच्या मदतीच्या भ्रमात राहून आमच्याशी पंगा घेवू नका" 
दोनच महिन्यांपूर्वी म्हणजेच जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये उडालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. यामध्ये चीनचेही सुमारे ४० सैनिक ठार झाले असल्याचे संगितले जाते. त्यानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य नियंत्रण रेषेपासून मागे घेण्याचे ठरविले होते. तर त्यापूर्वी भारताने सीमेवर दाखविलेल्या साहसामुळे आणि सैन्य तयारीमुळे चिनही घाबरला होता. तर भारताला गरज पडलीच अमेरिकासह फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आदी देशांनी भारताला उघड पाठींबा दिला होता. त्यामुळेही चीन नरमला.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने