वाईट स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे चीनी सैन्याला आदेश

चीनने घेतली भारताच्या युद्ध सज्जतेची धास्ती

डीएम रिपोर्ट्स- भारत आणि चीन या दोन देशांमध्ये चालू असलेल्या सीमा वादाला दररोज नवीन वळणे मिळत आहेत. दोन्ही देशांच्या वतीने सीमावाद शांततेने सोडविण्याचा प्रयत्न राजनैतिक पातळीवर होत असतानाच, दोन्ही देश युद्ध सज्जताही दाखवीत आहेत. तर भारताकडून लद्दाख भागत तैनात करण्यात आलेल्या सैन्यामुळे चीनी तंबूत चांगलीच घाबरहाट निर्माण झाली असून वाईट स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे सैन्याला आदेश देण्यात आले आहेत.

चीनच्या सैन्याने भारताच्या भूमीवर अतिक्रमण केले असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सतत होत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी नियमितपणे याच मुद्द्यावरून भाजप आणि त्यातही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ट्विट्टर, फेसबुकसारख्या समाज माध्यमांवरूनच झाडल्या जात आहेत. भारतात कॉंग्रेसकडून भाजपवर होणार्‍या या टीकेवरही भाष्य करण्यात आले असून विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टीकेमुळे मोदी सरकार चीनसोबतचा मुद्दा शांततेने सोडवून राष्ट्रवादी जनतेचा रोष ओढवून घेण्यास तयार नाही. याच पार्श्वभूमीवर चीनने आपल्या 'ग्लोबल टाइम्स' या वर्तमानपत्राच्या माध्यमातून चीनी सैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत 'ग्लोबल टाइम्स'ने केलेले पुढील ट्विट बोलके आहे.
"China should prepare for the worst-case scenario. Indian frontline troops could stay in border area over winter even that might cause non-combat casualties, as New Delhi fears that ending crisis peacefully could disappoint domestic nationalists."
या ट्विटमधून चीनने भारताच्या युद्ध सज्जतेची किती धसकी घेतली आहे, हेच दिसून येते. चीनच्या वाढत्या कुरापतींना भीक न घालता गेल्या काही वर्षांमध्ये भारताकडून खंबीर पावले उचलली जात आहेत. वेळ प्रसंगी जसेच्या तसे उत्तर देण्यात येत असल्याने, आता चीन नरमलेला दिसून येत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने