खातेदाराच्या खात्यातून रक्कम परस्पर वळविली; बँक व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

विश्वनाथ देशमुख
डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- खातेदाराचे १ लाख ७ हजार रुपये परस्पर इतर खात्यात वळवून फसवणूक केल्याप्रकरणी सेनगाव येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह रोखपाल व इतर एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खातेदाराच्या खात्यामधून परस्पर १ लाख ७ हजार रुपये परस्पर उचलून घेऊन खातेदार बाजीराव दादाराव पोले यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सेनगाव तालुक्यातील जामदया येथील लक्ष्मण नामदेव शेळके याच्यासह परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा सेनगावचे शाखाधिकारी पारीसकर व रोखपाल यांच्याविरुद्ध स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम हडप केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार बाजीराव दादाराव फुले परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सेनगाव येथील बँकेत खाते क्रमांक ००३२११२००५६७६ यामध्ये असलेले १ लाख ७ हजार रुपये वरील आरोपींनी संगणमत करून परस्पर उचलून घेतले.

ही रक्कम २३ एप्रिल ते १ जुलै २०२० दरम्यानच्या काळात परस्पर काढून घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. बाजीराव पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर हे करीत आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने