मोलकरीण, बांधकामगार महिलांना आर्थिक मदत दयावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनी आंदोलन छेडणार

संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन

डीएम रिपोर्ट्स- हिंगोली जिल्हयातील मोलकरीण व बांधकामगार महिलांना अन्यधान्य व आर्थिक मदत तात्काळ मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे संघटनेने  निवेदनाद्वारे मंगळवारी केली आहे. अन्यथा स्वातंत्र्य दिनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष पत्रकार सुधाकर वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, लाँककडाऊन असल्यामुळे आमचे कामकाज बंद आहे. आम्हाला शासनाने रोजगार मोलकरीण,बांधकाम महिलांना शासनाने तात्काळ मदत करावी , आम्ही महिला बांधकाम मोलकरीन लोकांच्या घरी काम करीत असल्याने सर्व महिलांना लाँकडाऊन असल्यामुळे कोरानाच्या भितीमुळे कोणीही आम्हाला घरकाम करण्यास टाळाटाळ करीत आहेत , मागिल चार महिण्यापासुन आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . तसेच आमच्या कुटूंबीयावर खुप मोठे संकट आले आहे . जिल्हयात तीन हजारापेक्षा पेक्षा जास्त मोलकरीन व बांधकामगार महिला आहेत . या सर्व मोलकरीन महिलांना शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी आमची महिला कामगार संघटनेची मागणी केली आहे. आमच्या मागण्या एका आठवडयात पुर्ण न झाल्यास पंधरा ऑगस्टला जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या अध्यक्षा राधा खंदारे अध्यक्षा अल्का गायकवाड,  आस्मा शेख आरेफ, वंदना मोरे  रुपाली गवळी,  संगिता मनवर,  कल्पना इंगोले आदींनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या