बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, ३१ ऑगस्टला चलो पंढरपूर…

नवनाथ कुटे
डीएम रिपोर्ट्स/विशेष प्रतींनिधी- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व काही आलबेल सुरू असताना, हरिनामावर मात्र बंदी आहे. मंदिरे बंद करण्यात आली असून, भजन करणाऱ्या वारकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. राज्यातील सध्याचे सरकार हिरण्यकश्यपू सरकार असून, या सरकारला धडा शिकवण्यासाठी विश्व वारकरी सेनेने चलो पंढरपूरचा नारा दिला आहे. येत्या ३१ ऑगस्टला श्री विठ्ठलाच्या मंदिरा समोर ठिय्या आंदोलन पुकारण्यात येत आहे. या आंदोलनात विश्व वारकरी सेनेचे एक लाख वारकरी उपस्थित राहणार आहे.
सामान्य माणसाच्या धार्मिक हक्कासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करून, धर्म मार्तंडांना धडकी भरविणाऱ्या क्रांतदर्शी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होत असून त्याचे नेतृत्व खुद्द घटनाकारांचे नातू करणार आहेत. सरकारने लॉकडाऊनचा फारसा बाऊ न करता धार्मिक स्थळे उघडी करून लोकांना भीतीतून बाहेर येण्यास मदत करावी अशी त्यांची मागणी असून त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकर ३१ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने