शेख मोसिन
डीएम रिपोर्ट्स/हट्टा- वसमत तालुक्यातील हट्टा येथील पोलिस कर्मचाऱ्यांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रॅपिड अॅंटीजन टेस्ट करण्यात आली. या तपासणीत त्यात ३४ पुरुष व १ महिला अशा ३५ पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात २ पुरुष कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळले असल्याने त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे.
हट्टा पोलिस स्टेशनचे एक कर्मचारी परभणी येथे कोरोना बाधित आढळल्यानंतर हट्टा येथील पोलीस स्टेशनच्या संपूर्ण अधिकारी व कर्मचार्यांची हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. त्यात दोन पुरुष कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. आता परभणी येथील तपासणीत आढळून आलेला एक आणि हट्टा येथे रॅपिड टेस्टमध्ये आढळून आलेले दोन असे एकूण ३ पोलीस कर्मचारी कोरोना सकारात्मक असल्याचे आढळून आले आहेत.
पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले असले तरी इतर कर्मचारी बाधित झाले नसल्याचे चाचणीत स्पष्ट झाले असल्याने कर्मचार्यांमधील भीती दूर झाली आहे. ही तपासणी डॉक्टर शमशोद्दीन व डॉक्टर कुठुळे त्यांनी केली असून आरोग्य कर्मचारी अजय थोरात व इतरांनी त्यांना सहाय्य केले. या चाचणीत दोन कर्मचारी कोरोना बाधित झाले असल्याचे आढळून आले असले तरी इतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सावधानिचा उपाय म्हणून आणखी काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे.