दोन दादा अन्‌ फडणवीस एकाच मंचावर.....

नवनाथ कुटे
डीएम रिपोर्ट्स/पुणे-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पिंपरी इथल्या कोविड सेंटरचं उदघाटन झालं. पिंपरी चिंचवड-महापालिकेतर्फे हे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत घडलेल्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत.
दरम्यान, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी वेळेत उपस्थितीत झाले होते. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे ४० मिनिटं उशिरा दाखल झाले. त्यामुळे अजित पवारांना ताटकाळत बसावं लागलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील हे तिघे जण राजकीय हेवीवेट नेते समजले जातात. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत, पहाटे घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. तत्पूर्वी चंद्रकात पाटलांचा चंपा असा उल्लेख करत अजितदादांनी राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधले होते. तर करोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य सरकारच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी चालविलेल्या विरोधी मोहिमेमुळे भाजपवर मोठी टीका झाली होती. महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे नव्याने ४०० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यानिमित्ताने हे तीनही राजकीय दिग्गज एकत्र आले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने