३० वाहनावर कारवाई करून ३० हजाराचा दंड वसूल, २० वाहने जप्त

औंढा पोलिसांची मोठी कारवाई

डीएम रिपोर्ट्स/औंढा नागनाथ- सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन संचार बंदी मध्ये विनाकारण परवाना नसताना फिरणाऱ्या ३० वाहनावर अवघ्या २ तासात औंढा पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करून ३० हाजाराचा दंड वसूल केला. तर २० वाहनेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली. पोलिसांकडून अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने विनाकारण संचारबंदीत फिरणाऱ्या वाहनधारकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

करोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात ६ ते १९ ऑगस्ट दरम्यान कडक व सक्त संचारबंदी चे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. यात जिल्हा बंदीचे आदेश लागू आहेत दरम्यान औंढा पोलीसांकडून औंढा - हिंगोली जाणाऱ्या राज्य रस्त्यावर ८ ऑगस्ट रोजी वाहनांची तपासणी केली. यात अत्यावश्यक सेवेतील व ई पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनास पुढे जाण्यास मुभा देण्यात आली. तर अनेक वाहणधारकाकडे ई पास परवाना नव्हते यात दुचाकीची संख्या मोठी होती आशा वाहनावर दंडात्मक कारवाई करून ३० हजार रुपयांचा  दंड वसूल करून २० वाहने जप्त केली. तर अनेकांना लाठी प्रसादही मिळाला यामुळे दुचाकी चारचाकी वाहन धारकांची चांगलीच धावपळ झाली. पथकाने अवघ्या दोन तासात कारवाई केली. पथकात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, जमादार अफसर पठाण,बंडू घुगे, गणेश नरोटे, खिजर पाशा, अतुल बोरकर, गजानन गिरी, राजकुमार सुर्वे, थावरा राठोड, ज्ञानेश्वर गोरे, रवी इंगोले, सुखदेव जाधव, कोंढबा वाढवे, इक्बाल शेख, यांचा सहभाग होता.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने