मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बळीराजाचा सण: बैलपोळा

शाळेमध्ये असताना जेव्हा माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहायला सांगायचे, तेव्हा दिवाळी व पोळा या दोन सणावर जास्त निबंध लिहिला जायचा. लहान लेकरा पासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मुक्या प्राण्याबद्दल आपुलकी असते पण शेतकर्याला व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या शेतातील जनावरं बदल बैलाबद्दल एक जिव्हाळा असतो तो प्रकर्षाने दिसत नाही पण मनामध्ये फार गडद असतो.
शेतकऱ्याला जशे राजा म्हणले जाते. त्याप्रमाणे बैल हा त्या राज्याचा सरसेनापतीच म्हणावे लागेल, कारण शेतकऱ्याची खरी दौलत ही त्याची बैलजोडी असते. कारण प्रत्येक कामामध्ये तो असतोच, धान्याच्या पेरणीपासून ते त्या पिकाच्या काढणीपर्यंत. आता सदन शेतकऱ्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आली आहेत. त्यामुळे बैलजोडीची प्रमाण हे काही प्रमाणात कमी झाले आहे. परंतु त्यांचे महत्त्व कमी झाले किवा काम संपले असे म्हणता येणार नाही. कारण ते कधीच होणार नाही. प्रत्येक काम हे आधुनिक तंत्रज्ञानाने होणार नाही ते पूर्णत्वास नेण्यासाठी पारंपारिकतेची ची जोडनी द्यावीच लागते.

जिथे शेती व शेतकरी हा शब्द लागला जातो, तिथे नकळतच बैल हा प्राणी जोडला जातो. कारण त्याशिवाय शेती संज्ञा च पूर्ण होत नाही. आणि बैलजोडी शिवाय शेतीची कल्पना सुद्धा करणे शक्य नाही.

विचार जर केला तर खरंच बैल हा प्राणी जनावर किती कष्ट घेतो. ते पण त्याच्या मालकासाठी. जेव्हा त्या मालकाला त्या शेतात बैलाची गरज असते तेव्हा तो मुका प्राणी हजर असतो. कधी असे ऐकले आहे का की, बैलाला कंटाळा आला म्हणून काम बंद केली आहे. तर नाही कारण ते फक्त कष्ट करण्यासाठी जन्माला आलेली असतात. आणि ते पण प्रामाणिकपणे. पण जेव्हा माणूस थकतो तेव्हा तो स्वतः काम थांबतो व विश्रांती घेतो. पण ते मुक जनावर कधीच त्या मालकाला निराश करत नाही. मालक जेवढी शेतीचे काम त्यांच्याकडून करून घेतो तो तेवढी काम प्रामाणिकपणे करत राहतो.

आधुनिक तंत्रज्ञान व धकाधकीच्या आयुष्या मुळे मानवाचे जीवन घड्याळ्याच्या काट्यावर आले आहे. वेळेला महत्त्व आलेले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे मानवा मधला संयम कमी झाला आहे. पण ते उघडपणे मान्य करत नाही. सगळं काही लवकर पाहिजे असतं व इतरांपेक्षा जास्त पाहिजे असतं. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन वेगवेगळ्या यंत्राच्या उपकरणाच्या साह्याने आधुनिक शेती करत आहे. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगरणी, मोगडणी, हालर करणे, असे वेगवेगळे यंत्र वापरत आहेत. पण या यंत्रावर बरोबरच पारंपारिक शेतीची जोड द्यावी लागते व कधीकधी बैल जोडी चा वापर करावा लागतो व तिथे कोणतीच तंत्र यंत्र चालले शक्य नसते.

आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानामुळे जरी सदन शेतकऱ्याकडे शेतीची विविध यंत्र असले तरी बैलजोडीही त्याच्याकडे असणारच. कारण "शेती+बैलजोडी = सफल शेतकरी" हे जणू सूत्र आहे. पण जो शेतकरी कमी शेती असणारा आहे त्याच्याकडे सर्व काही त्या बैलजोडी वरच अवलंबून असते. तेव्हा हा मुका प्राणी बैल मालकांनी करून घेतलेली प्रत्येक कार्य प्रामाणिक पणे करत असतो. त्या प्राण्याच्या व त्याच्या मालकाच्या कष्टाची फळ हे कालांतराने त्या शेतकर्याला मिळते.
पण एवढ्या मध्ये मला एक गोष्ट समजत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती काही काम करत नाही तेव्हा त्याला बैल आहेस असे का म्हणतात...? करणं बैल तर त्या शेतकऱ्यांसाठी आपल्या मालकासाठी प्रामाणिकपणे अगदी शिताफीने कार्य करत असतो, मग त्याला कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याची उपमा का दिली जाते...? असो....

शेतकरी आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या या मुक्या जनावरांची काळजी नेहमीच स्वतःच्या लेकराप्रमाणे घेत असतो. त्याला कधी काही झाले तर त्या शेतकऱ्याला अक्षरशः शांत झोप लागत नाही. कारण ते नातं मालक व मुक जनावर त्याच्या पलीकडे झालेली असते. तिथे एखाद्या स्वतःच्या पोटच्या पोरासारखा जिव्हाळा त्या प्राण्यासोबत लागलेला असतो. तुम्ही कधी पण पहा त्या शेतकऱ्याचे अगदी लहान मूल सुद्धा त्या मुक्या जनावर सोबत अगदी निर्धास्तपणे खेळत असतात. आणि ते त्या लेकराला काही करणार नाही हा त्या मालकाचा विश्वास असतो. हे विश्वास त्या दोघांमधले नात्या बद्दल सगळं काही सांगून जातो. कुणाचा विश्वास तोडणे हे मानवी स्वभावाची लक्षण आहे, त्या प्राण्यांच्या नाही. त्यामुळे हे नाते दीर्घकाळापर्यंत व त्या प्राण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नेहमी टिकून राहते.

या मुक्या जनावरांचा म्हणजेच बैलाचा त्या शेतकऱ्याच्या काळ्या मातीत राबणाऱ्या त्याच्या लेकराच्या सण म्हणजे पोळा. शेतकरी फार मोठ्या आनंदाने साजरा करतो ते एक दोन दिवस त्या बैलाला कोणत्याही शेतीच्या कामासाठी जुंपले जात नाही. अगदी सगळं काही नवीन घेतला जाते. साबण लावून अंघोळ घालने, येसन, गाठल, दोरी, शिंगणा नवीन रंग, गोंडे, झुली घालने. इत्यादी आपली बैलजोडी ही इतरांपेक्षा चांगली व रूबाबदार दिसावी यासाठी तर शेतकरी त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. मग तो सदन शेतकरी असो किंवा साधारण शेतकरी असो. यांच्या वाढदिवसा सारखा सण साजरा केला जातो. त्याला गोड नैवद्य खाऊ घातला जाते. त्यांना घरी आणून त्या बैलजोडीची परंपरेनुसार रीती-रिवाजाने संपूर्ण कुटुंब त्यांची पूजा करते. त्यांचे लग्न लावले जाते.

एक प्रकारे त्यांचे आभारच मानले जाते की, "तू मला या काळ्यामातीत सोन उगवण्या साठी वेळोवेळी मदत केली त्याबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे." व त्याचबरोबर एक वचन सुद्धा त्याच्या कडून घेतले जात असावे की, "अशीच साथ तू मला या समोर पण वेळोवेळी द्यावी" असे त्या वेळेस त्या मालकाची म्हणजे शेतकऱ्याची मनाची अवस्था व त्याच्या मनातील विचार असतील. तो शेतकरी त्या दिवशी आपल्या बैलजोडी समोर व त्याच्या खरी दौलत असणाऱ्या त्या मुक्या जनावराला समोर अक्षरशः नतमस्तक होतो व त्याचे आभार मानतो.

आणि दुसऱ्या दिवशी पासून शेतकरी व त्याची बैलजोडी शेतामध्ये पुन्हा कामात स्वतःला वाहून घेतात.

लेखक:- 
दिपक व्यंकटराव नादरे (Psychologist)
Mob: 9970722141, 7972338248

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने