पुढील महिन्यापासून शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांची असहमती

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्रामध्ये नजीकच्या काळात शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या देशातील काँग्रेस आघाडीशासित ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असहमती दर्शविली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जानेवारी २०२१ पर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतातील काँग्रेस आघाडीशासित ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीत सर्व सातही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांच्यासमोर विवेचन केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांच्या बाबतीत बोलताना, अमेरिकेतील परिस्थितीचा दाखला देऊन सांगितले, की अमेरिकेत शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर ९७ हजार बालकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे.
There was a report from the US that about 97,000 children were infected by #COVID19 when schools were opened. What will we do if such a situation arises here?: Maharashtra CM Uddhav Thackeray at Sonia Gandhi's virtual meet with CMs of 7 states.- ANI, Reports.
अशीच परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवल्यास काय करणार? असा प्रश्‍न करून त्यांनी नजीकच्या काळात शाळा पुन्हा सुरू होण्यास होण्याच्या शक्यतेला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने सध्याच्या परिस्थितीचा विचार करून शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विचार केल्यास पुढील ४ महिने म्हणजेच जानेवारी-२०२१ पर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.

Read This News In English on.. www.raavan.cc

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने