१७ वर्षीय मुलीवर तीन वर्षापासून बलात्कार: बासंबा पोलीसात गुन्हा दाखल

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- तालुक्यातील बासंबा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खर्डावाडी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील तीन वर्षापासून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील खेर्डावाडी येथील   एका १७ वर्षीय मुलीवर मागील ३ वर्षापासून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार बासंबा पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटना तालुक्यातील हिंगोली तालुक्यातील कलगांव माळरानावर, कळमनुरी जवळील रुपुर, दुदाधारी परिसरात व आरोपीच्या घरी आणि हिंगोली ते औंढा नागनाथ तालुक्यातील गलांडी भागात वेळोवेळी घडली आहे. याबाबत कुणाला काही माहिती सांगितली तर जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. या घटनेतील आरोपी, गंगाधर कैलास ठोंबरे हा गावातीलच असून त्याच्यावर आरोपीवर बासंबा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मलपिलू, पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस नाईक नानाराव पोले आणि पथक करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या