हिंगोली जिल्ह्यात तिसर्‍या दिवशीही ७५ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे, एकूण रुग्ण २०४

२१ ऑगस्ट रोजी झाले होते ९४ रुग्ण बरे....

डीएम रिपोर्ट्स- तिसर्‍या दिवशीही मोठ्या संख्येत कोरोनाचे रुग्ण बारे झाले असल्याने आता हिंगोली जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आज सलग दुसर्‍या ७५ पेक्षा जास्त रुग्ण बारे झाले असून आज तब्बल ७७ रुग्ण बारे झाल्याने जिल्ह्यात आता २०४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. तर आज जिल्ह्यात कोविड-१९ चे नवीन १८ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात आज १८ नवीन कोविड-१९ चे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर १२ व्यक्ती, वसमत परिसर ५ व्यक्ती, औंढा परिसर १ असे एकुण १८ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर आज कोविड-१९ मुळे एका जणाचा मृत्यू झाला असून ७७ कोविड-१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-१९ रुग्णांपैकी १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-१९ च्या ०३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १७ रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-१९ चे एकूण १३१३ रुग्ण झाले असून, त्यापैकी १०९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण २०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-१९ मुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या