जगन्नाथ पुरी
डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ हिंगोली तालुका अध्यक्ष पदी महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध वारकरी भुषण ह. भ. प पुरुषोत्तम महाराज जांभरुणकर संत श्रीराम महाराज जांभरुणकर यांचे नातू यांची निवड झाली.
वारकरी महामंडळ ही संघटना वारकऱ्यांचे संघटन व एकीची वज्र्मूठ निर्माण व्हावी यासाठी संतवीर वै.रामदास म. मनसुख यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील सर्वात पहिली वारकरी संघठना आहे. महामंडळाची मान्यता शासनाद्वारे प्राप्त असणारे एकमेव संघटन ज्या संघटनेच्या द्वारे पंढरपुरातील पांडुरंग मंदिर सर्वासाठी खुले झाले. देहू आणि आळंदी येथे इंद्रायणी मातेच्या निर्मल पाण्यामध्ये डाउ कंपनी या सारख्या घातक कंपन्यांनी विषारी द्रव पदार्थ सोडले होते त्यासाठी व्यापक डाउ हटाव आंदोलन करून इंद्रायणी शुध्द ठेवण्याचं काम याच वारकरी महामंडळाने केले होते अशी ही राज्यव्यापी व देशव्यापी असलेली ही वारकरी महामंडळ संघटना आहे. या संघटनेच्या हिंगोली तालुका अध्यक्ष पदी ह. भ. प पुरुषोत्तम महाराज जांभरुणकर संत श्रीराम महाराज जांभरुणकर यांचे नातू यांची निवड झाली व उपाध्यक्ष परमेश्वर महाराज जाधव, कोषाध्यक्ष संदीप महाराज पाटील, सचिव राजू महाराज नागरे, सल्लागार केशव महाराज पवार, संघटक विष्णु महाराज डांगे, परिचारक केशव महाराज कंठाळे या सर्वांची निवड झाली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe