'मोदींच्या भित्रेपणामुळे भारतीय भूमी चीनच्या ताब्यात, तर खोटारडेपणामुळे झाले शिक्कामोर्तब'

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून मोदींवर पुन्हा हल्लाबोल

डीएम रिपोर्ट्स- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणातून अनेक भारतीयांना ऊर्जा मिळाली असेलही; परंतु कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत-चीन मधील वादाला फोडणी दिली आहे. आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी, चीनने भारताच्या भूमीवर आक्रमण करून आपली भूमी ताब्यात घेतली असल्याचे विधान केले असून याला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भित्रेपणा आणि खोटारडेपणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे अधिकारी आणि जवान अशा २० सैनिक शहीद झाले होते. तर भारतीय सैनिकांनी केलेल्या उत्तरादाखल हल्ल्यात चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले असल्याचे संगितले जात आहे. परंतु नेमके किती चीनी सैनिक ठार झाले याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही. आणि त्याच कारणामुळे कॉंग्रेसकडून याची अनेकवेळा विचारणा झाली आहे. तसेच भारतीय भूमी चीनने ताब्यात घेतली असल्याचा आरोपही केला आहे. तर मोदी सरकार आणि विशेषत: भाजपवाल्यांमधून राहुल गांधी आणि कॉंग्रेस भारतीय सैन्यावर शंका घेत असल्याचा आरोप होत आला आहे. ही टीकाटिप्पणी अद्यापही चालूच असून ताज्या घटनेत, राहुल गांधी यांनी पुन्हा प्रधानमंत्री राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Everybody believes in the capability and valour of the Indian army.Except the PM:Whose cowardice allowed China to take our land.Whose lies will ensure they keep it.
(भारतीय सैनिकांचे शौर्य आणि क्षमतेवर सर्वांचा विश्वास आहे. फक्त मोदी यांचा नाही. मोदी यांच्या भित्रेपणाने चिनला आपली भूमी बाळकवता आली. आणि आता त्यांचा खोटारडेपणा ती भूमी चीनच्या ताब्यात राहील हे स्पष्ट करील.)
अशा शब्दांमध्ये राहुल गांधी मोदी यांच्यावर हल्ला चढविला आहे. चीनने भारताची कोणत्या ठिकाणची आणि किती जमीन बळकावली आणि त्याठिकाणी आता कोणाचे सैन्य आहे, याबाबत कॉंग्रेसकडून मात्र अद्यापही मीडियाकडे बोलून किंवा सरकारकडे तक्रार करून ठोस असे पुरावे देण्यात आले नाहीत. तर कॉंग्रेसचा आरोप खोटा असल्याने आणि सरकारची प्रतिमा, मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होत असताना भाजप किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडूनही कॉंग्रेसवर न्यायालयात एखादा दावा दाखल करण्यात आला नाही. प्रधानमंत्री सारख्या देशाच्या सर्वोच्च कार्यकारी प्रमुखाला खोटारडे, भित्रा, रखवालदार चोर है असे संबोधले जात असताना आणि त्यावर प्रधानमंत्री यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, कुठे तरी पाणी मुरत असल्याचा देशवाशीयांना संशय येत आहे. 'मोदींच्या भित्रेपणामुळे भारतीय भूमी चीनच्या ताब्यात, तर खोटारडेपणामुळे झाले शिक्कामोर्तब' असल्या विधांनामुळे चीनने भारताची जमीन खरेच बळकावली असल्याच्या कॉंग्रेसच्या दाव्याला, आरोपाला अधिक पुष्टी मिळाल्यासारखे होत आहे. 



The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने