सततच्या पावसामूळे मुगाच्या शेंगांना झाडवरच कोंब....

शिवशंकर निरगुडे
डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- तालुक्यातील साखरा, हत्ता नाईक, कापडशिंगि, हिवरखेडा यासह तालुक्यातील अनेक भागातील मूग, उडीद हे हाताशी आलेले पीक सततच्या पावसामुळे भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
मूग, उडीद या पिकांसोबतच सोयाबीन देखील जास्त पावसामुळे पिवळी पडत आहे. आस्मानी संकटांची मालिका शेतक-यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. पाचसहा वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप,रब्बी पिके हातात आली नाहीत. या वर्षी जुनला मृगात पेरणी झाली. चांगली पिके येतील अशी आशा असतानाच तोडनीला आलेल्या मुगाच्या शेंगांना सतत होत असलेल्या पावसामुळे तोडणी अभावी झाडावरच कोंब फुटले असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती सोयाबीन पिकाची असून या पिकाचे पाने पिवळे पडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने