डीएम रिपोर्ट्स- बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी हिंगोली येथील एका माजी नगरसेवकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख मुंतजिम शेख मौला असे प्रमुख आरोपीचे नाव आहे.
याबाबत हिंगोली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मो. हुसेन मिया आ. गफुर यांचा मृत्यू मक्का सौदी अरेबिया येथे जानेवारी २००६ मध्ये झाला होता. असे असतांनाही माजी नगरसेवक असलेला शेख मुंतजिम शेख मौला आणि इतरांनी मयताचा मृत्यू हिंगोली शहरातच झाला असल्याचे दाखवून दिनांक २१ जानेवारी २००६ रोजी मयताचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढले.
ही बाब नगर परिषदेचे निदर्शनास आल्यावर याबाबत आज नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक संदीप विश्वनाथ घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६८, ४७१ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:
crime
Hingoli Municipal Council
Municipal Council
Municipal Council Hing
Municipal Council Hingo
Municipal Council Hingol
Municipal Council Hingoli
state