शाळा बंद असतांनाही शैक्षणिक शुल्क भरावेच लागेल; एकदाच शक्य नसल्यास टप्प्याटप्प्याने भरण्याचे शिक्षणमंत्र्यांची पालकांना सूचना

बिभीशन जोशी/नवनाथ कुटे
डीएम रेपोर्ट्स/हिंगोली- लॉकडाउन आणि कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने नागरिकांना मूलभूत गरजांसाठी पळापळ करावी लागत असताना आता बंद असलेल्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून पैसा उकळणे सुरू केले आहे. आशा स्थितीत शासनाकडून काही दिलासा मिळण्याऐवजी हिंगोलीच्या पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, शुल्क रद्द करणे तर सोडाच; ५० टक्के कपात करण्यासाठी सुद्धा आज कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. उलट त्यांनी शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या असल्याने, पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काय म्हणाल्या पालकमंत्री?
सध्या कोरोना वाढता प्रादुर्भाव यामुळे पालकांची शुल्क भरण्यास परिस्थिती नाही, असे सांगून काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.तर काहींच्या पगारात कपात झाली आहे, तर काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे पालकांची शुल्कभरण्याची परिस्थिती राहिली नसल्याचे सांगून शैक्षणीक संस्थांना देखील आम्ही सांगितले आहे. यासंदर्भात शासनाने आदेशीत केले होते, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी बोलतांना माहिती दिली आहे. 
त्या पुढे म्हणाल्या, शैक्षणिक संस्थांनी टप्या टप्या नुसार फी घ्यावी, सहा महिन्याला किंवा तीन महिन्याला फी घेऊन पालकांना सपोर्ट करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थाचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी एकमेकांच्या सहकार्याने हा प्रश्न हँडल करण्याचे सांगितले. याबाबत राज्य शासनाने ८ मे रोजी परिपत्रक काढले होते. परंतु हे प्रकरण मा. उच्य न्यायालयात गेल्याने त्यावर स्टे दिला गेला. आता राज्यशासन सुप्रीम कोर्टात केस लढत आहे.
लॉकडाऊनमूळे प्रत्येकाचे जीवन जगणे मुश्कील होऊन बसले आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा बंदच असल्याने विद्यार्थी शाळेत जात नाहीत. त्यामुळे परंतु शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी विशेषत: खाजगी, इंग्रजी शाळांनी पालकांना फिस भरण्यासाठी तगादा लावला आहे. शाळेत शिक्षक नाही, कर्मचारी नाहीत, कुणीच नाही. असे असतांनाही शाळा व्यवस्थापनाने पूर्ण शुल्क उकळणे सुरू केले आहे. याबाबत आज हिंगोलीच्या पालकमंत्री तथा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शालेय शुल्क भरण्याबाबत राज्य शासनाची भूमिका सांगितली. पालकांना शिक्षण शुल्क भरावेच लागेल. परंतु ज्यांची आर्थिक स्थिति हालाकीची आहे किंवा एकदाच पूर्ण फिस भरणे शक्य होत नाही, अशा पालकांनी टप्प्याटप्प्याने फिस भरावी असे त्यांनी संगितले. त्यामुळे पालकांना फिस भरावीच लागणार असल्याचे दिसून येत आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे हळू का होईना पण संस्था चालकांनाच फायदा होणार हे मात्र सत्य. आता अशा परिस्थितीमध्ये नेमकं पालकांनी शाळेची फी भरावी तरी कशी हा प्रश्‍न प्रत्येक पालकासमोर उपस्थित झालेला आहे. अगोदरच कोरोनाने हतबल झालेला पालक आता शाळेच्या हीच मुळे पुन्हा एकदा हतबल होण्याची दाट शक्यता आहे.

खाजगी शाळेची फिस ५० टक्के कमी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

आज हिंगोली येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात शाळेची फिस ५०% एवढीच घेण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मंत्री गायकवाड यांनी लवकरच यावर निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. या वेळी वसमत विधानसभाचे आमदार राजू नवघरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, उपाध्यक्ष ईश्वर उरेवार, मनोज बांगर, इरफान पठाण व पदाधिकारी उपस्थित होते.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

7 टिप्पण्या

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

  1. If parents are introuble teachers and management is also in trouble
    Full world is in trouble.but parents
    Pay electricity bill or their electricity will be cut. They pay their phone re charge because their phones will stop working. and every thing is going on but when the question comes to pay fees not only now in this time of trouble but also when every thing is ok parents always have some or the other excuse not to pay fees please keep in mind that all the school's
    are not commercialized. and also some parents are prompt in paying fees but are they fools then why paying fees is only the issue. Yes we can understand that this is crucial time but parents please
    Pay the fees part payments
    Like quaterly half yearly . Let us help each other and move forward to educate our children and make their future, so that they will be ready to face any situation bravely
    with sound mind.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. yes why not ,but before asking fees once every one should think for what we are asking fees for education that u r providing or to take a advantage of earning money , definitely every one should pay only for what they are getting

      हटवा
    2. फी भरायला पालकांना काहीच हरकत नाही. फक्त ज्या विशयाचे प्रॅक्टीकल होत नाहीत, परीक्षा होत नाहीत अजून इतरही काही गाष्टी आहेत त्याची फी शाळा अथवा संस्था का घेत आहे. यासाठी पालकांचा विरोध आहे.

      हटवा
    3. Everyone is in trouble. This year take only teaching fees because Teachers should not be in trouble. School already took extra money for educational app.+They have to pay net charges. Before this Those who able they only took admission in private schools. Parents were thinking everything will be ok and they pay fees but not situation is out of control. So It's my kind request everyone should try to take concessions in fees atleast this year from next year Those who able they only take admission.

      हटवा
  2. It has become fashion among journalist to give gali to schools painting private schools as exploiters ... In the pursuit of pleasing public and their political masters .. Forgetting that its government s failure to prove quality education for free to all children... that has has led to the mushrooming of English medium schools..

    उत्तर द्याहटवा
  3. आमच्यासारखे काही संस्थाचालक निमशहरी भागात स्वत: पदरमोड करून, उच्च ध्येय्याने प्रेरीत होऊन मराठी माध्यमाच्या शाळा चालवित आहेत.

    आमचे ऑनलाईन वर्ग चालू आहेत. आम्हांला शिक्षकांना पगार द्यावा लागतो. शाळेच्या देखभालीचा खर्च चालूच आहे. वीज, पाणी, जागेचे कर हे खर्च तर करावेच लागतात.पालकांनी फी भरली नाही तर कोठून आणणायचे इतके पैसे? शाळा किती दिवस अशी चालविता येईल?

    पालकांनी, सरकारने आमचाही विचार करायला हवा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Tumhi sarkar kadun grant ka ghet nhit......... School he aata Vidya danache thikan nasun fakta paisa kamavnyache dukan zale aahe.....

      Government grant dete pan sanstha grant ghet nahit karan fees manmarji pramane gheta yet nahi

      हटवा
थोडे नवीन जरा जुने