किनवट- माहुर रस्त्यावरील पर्यायी पुल पुन्हा एकदा वाहुन गेला अनेक गावाचा संपर्क तुटला

नवनाथ कुटे
डीएम रिपोर्ट्स/ नांदेड
- किनवट माहूर महामार्गावरील घोटी गावानजीक चा पर्यायी पूल पुन्हा एकदा वाहुन गेल्यामुळे विदर्भ ,तेलंगाणा , माहूर सह १०० गावचा पुन्हा संपर्क तुटला आहे.
कोठारी ते धनोडा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम चालू आहे. घोटी येथील पुला चे बांधकाम चालू असून प्रवाशांना पर्यायी फुलाची व्यवस्था करून देण्यात आली होती. परंतु दोन दिवसाच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे सदरील पर्याय पूल पुन्हा वाहून गेला आहे. यापूर्वी एक महिना अगोदर हाच पर्यायी पूल वाहून गेला होता व दुरुस्त करण्यासाठी बरेच दिवस लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.उद्या शेतकऱ्यांचा पोळा सण असल्याने बरेच लोक पोळ्या चा बाजार करण्यासाठी किनवट ला होते.आता आपल्या गावाला परत जाताना नागरिकांची दमछाक होणार आहे. सदरील काम नांदेडच्या शारदा कंस्ट्रक्शन कंपनी चे असून पूर्वीसारखेच जास्त वेळ न लावता ताबडतोब पर्यायी फुलाची व्यवस्था करून द्यावी व नागरिकांना दिलासा द्यावा असे येथील परिसरातील जनतेची मागणी आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने