वंचित बहुजन आघाडीच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा संघटक मा.रविंद्र वाढे यांचा १५ ऑगस्ट २०२० रोजी जन्मदिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६४ जणांनी रक्तदान केले. हे शिबीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत. तब्बल 64 दात्यानी रक्तदान केले. यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा लाभ होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसिम देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मा.दिवाकर माने उपस्थित होते. भारीप बहुजन महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष मा.ज्योतीपाल रणवीर यांनी हे शिबीर आयोजित केले होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रतन लोणकर, योगेश नरवाडे, बबन भूक्तर, रघुवीर हनवते, सचिन हनवते, भीमा सुर्यतळ, माणिक पंडित, राजू कांबळे, प्रकाश गव्हाणे, भूषण पाईकराव, सुरेश धोत्रे, रुपेश कदम, शंकर पोघे, प्रल्हाद धाबे, शुभम पाईकराव, अक्षय वाढे, भाग्यवान लोखंडे, चंद्रगुप्त, वाढे, सतीश वाढे, विशाल वाढे, प्रवीण पाईकराव, संदेश कोल्हे, अनिल वाढे, नितीन खिल्लारे, दीपक धांडे, शासकीय रक्तपेढी येथील कर्मचारी संदीप साळुंखे, अनुराधा पथरोड, बंडू नरवाडे, संदीप घुगे यांनी रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य केले वंचित बहुजन आघाडी, भारीप बहुजन महासंघ व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने