भारतातील फेसबूक, वॉटसअप भाजप, आरएसएसच्या दावणीला: राहुल गांधी यांचा आरोप

फेसबूक पोलिसीच्या विरोधात असूनही संघ, भाजपच्या वादग्रस्त नेत्यांना फेसबूकवरुन हटविले नाही- 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधील बातमी

डीएम रिपोर्ट्स/रावण धाबे- भारतातील फेसबूक आणि वॉटसअप भाजप आरएसएसच्या दावणीला बांधले असून त्यामुळेच या दोन्ही समाज माध्यमावरुन समाजात द्वेष भावना पसरविणारे संदेश पाठविले जातात, असा आरोप करतानाच ही बाब अमेरिकन मीडिया (Wall Street Journal) ने उघड केली असल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
संकल्पित छायाचित्र (Democrat MAHARASHTRA)
अमेरिकन वृत्तपत्र 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या १५-१६ ऑगस्ट रोजीच्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या 'फेसबुक हेट-स्पीच रूल्स कोलईड विथ इंडियन पॉलिटिक्स'-("Facebook Hate-speech Rules Collied With Indian Politics"फेसबुकच्या द्वेषयुक्त भाषण नियमाविरुद्ध भारतीय राजकारण) या मथळ्याखाली छापण्यात आलेल्या वृत्ताचा हवाला कॉंग्रेस नेते राहुल यांनी दिला आहे. या मथळ्याखालीच "कंपनी एक्झेकुटीव ऑपोज्ड मुव्ह टू बॅन कंट्रोवर्सीयल पॉलिटीशियन" (Company Executives Opposed Move To Ban Controversial Politicians- वादग्रस्त नेत्यांना प्रतिबंधित करण्यासाठी कंपनीच्या प्रमुखांचा विरोध) असा एक उप- मथळा देण्यात आला आहे. यावर राहुल गांधी यांनी ट्विट्टरवर पोस्ट शेअर करून हा आरोप लागवला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की
BJP & RSS control Facebook & Whatsapp in India. They spread fake news and hatred through it and use it to influence the electorate. Finally, the American media has come out with the truth about Facebook.
भारतात फेसबूक आणि वॉटसअप भाजप, आरएसएसवाले चालवीत आहेत. या माध्यमांमधून हे लोक बोगस बातम्या आणि द्वेषयुक्त संदेश पसरवून मतदारांवर प्रभाव टाकतात. शेवटी अमेरिकन मीडियाने फेसबुकबाबतचे सत्य समोर आणलेच.
असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी सबंधित बातमीचे कात्रण सुद्धा पोस्ट केले आहे. या बातमीत भारतातील वादग्रस्त राजकारणी मंडळींना फेसबुकने कसा वरदहस्त दिला आणि त्यांनी फेसबुकच्या द्वेष पसरविणार्‍या नीतीनियमांच्या विरोधी काम करूनही त्यांच्यावर प्रतिबंध कसा घातला नाही, याचे विवेचन करण्यात आले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने