लेखी परीक्षा न देता भारतीय लष्करात व्हा सरळ अधिकारी....

डीएम रिपोर्ट्स- ज्यांना मिलिटरी रुबाब, खाकी वर्दीची आवड आहे, देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची दृढ इच्छा आहे आणि इतर कोणत्याही नोकरीपेक्षा समाजात सर्वात जास्त सन्मान आणि मोठा पगार देणारी सरकारी नोकरी हवी असल्यास अशा १२ वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा न देता (army officer without taking written exam) १२ मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारी नुसार त्यांची पुढील निवड प्रक्रिया होणार आहे. 
याबाबत इंडियन आर्मीने (Join Indian Army) नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १० ऑगस्ट २०२० पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२० रात्री १२ वाजेपर्यंत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून इंडियन आर्मीच्या या www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर हे अर्ज भरता येणार आहेत. ही भरती ९० पदांसाठी असून या पदांमध्ये वाढ सुद्धा होवू शकते. 
किमान वय १६ वर्षे ६ महीने आणि कमाल १९ वर्षे ६ महीने अशी वयाची अट असून उमेदवारचा जन्म २ जुलै २००१ च्या पूर्वी आणि १ जुलै २००४ च्या नंतर झालेला नसावा. उमेदवार हा विज्ञान विद्याशाखेतून उत्तीर्ण झालेला आणि फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ (Physics, Chemistry and Math PCM Group) या विषयांमध्ये सुद्धा सरासरी ७० टक्के गूण असणे आवश्यक आहे.

उमेदवार हा शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असावा आणि त्यातही तो अविवाहित असावा. तसेच ही भरती केवळ पुरुष उमेदवारांसाठीच आहे. पाच वर्षांची ट्रेनिंग (SSB) पूर्ण होईपर्यंत त्याला लग्न करता येणार नाही आणि तसे त्याला हमीपत्र भारतीय सैन्यात द्यावे लागणार आहे.

आर्मीच्या वतीने बारावीच्या गुणांच्या आधारे मेरीटनुसार निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ५ दिवसांच्या मुलाखतीसाठी (SSB Interview) बोलवण्यात येतील. यामध्ये उमेदवाराची शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येतील. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर पुढील प्रकिया झाल्यावर पाच  वर्षांचे प्रशिक्षण आणि 
नंतर सरळ लेफ्टनंट या अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात येईल.
विशेष म्हणजे ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या उमेदवारांना ५६ हजार १०० रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे. तर प्रशिक्षणाचे ४ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना लेफ्टनंट पदाचे वेतन मिळणार आहे. जगभरातील सैन्य दलांचा विचार केल्यास जे काही मोजके देश सैन्य बलात प्रभावी आहेत त्यापैकी एक भारतीय सैन्य आहे.  त्यामुळे भारतीय सैनिक असो किंवा अधिकारी सर्वांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या भरतीत निवडलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणावर एका आठवड्याचा खर्च ८ हजार ७८५ रुपये एवढा होत असतो. हा खर्च सरकार करीत असतो आणि ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरी सोडली तर हा खर्च उमेदवारकडून वसूल केला जातो.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

2 टिप्पण्या

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने