आता राज्यातील ‘या’ बड्या मंत्र्याला झाला कोरोना

डीएम रिपोर्ट्स/नवनाथ कुटे- जगभरासह देश कोरोनावर मात करण्यासाठी झुंजत असताना मंत्र्याना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता राज्यातल्या या बड्या मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आता बाळासाहेब पाटील यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील ध्वजारोहण कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते ध्वजारोहण कार्यक्रमास अनुउपस्थितीत राहिले. तसेच साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने