माहिती अधिकाऱ्यांमुळे पत्रकारांवर घोर अन्याय, कारवाईची मागणी

५ सप्टेंबर पासून करणार अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण....

डीएम रिपोर्ट्स/अकोला:- जिल्हा माहीती अधिकारी मिलींद दुसाने यांनी शासन नियमाची पायमल्ली करून साप्ताहिकांना हेतुपुरस्सरपणे यादीवर न घेणे तसेच सरसकट दरवाढ असतांना दरवाढ न केल्याने कोरानाचे महामारीत साप्ताहिकाचे मालक संपादकांनावर उपासमारीची पाळी आणणार्‍यां अधिकार्‍याची चौकशी करावी, तसेच पुर्नचौकशी करून साप्ताहीकांना यादीवर घेण्यात यावे, तसेच दरवाढ करण्यात यावी या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती पत्रकार पंजाबराव वर यांनी दिली.
फोटो सौजन्य:- गुगल, भारत.
जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्राचे मालक/संपादक आहो. गेल्या १० ते २० वर्षापासून नियमीत वृत्तपत्रे चालवीत असून समाज प्रबोधनाचे काम करतात असे असतांना वृत्तपत्रांना शासनमान्य यादीत नाव समाविष्ट करणेसाठी/ जाहीरात दर वाढीबाबत अर्ज सादर केले होते. 

याबाबत देण्यात असलेल्या निवेदनानुसार, सर्व पत्रकारांनी जिल्हा माहिती अधिकारी, अकोला  यांचे समक्ष सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. मान्यताप्राप्त जाहिरात यादीत वृत्तपत्रांचा नव्याने समावेश / दरवाढ करण्याकरीता अर्ज सादर केले होते. हेतुपुरस्सरपणे जिल्हा माहीती अधिकारी यांनी टाळून आमचे नुकसान केले आहे व भ्रष्टाचार करून ज्यांंची कागदपत्रे कमी असतांना त्यांना यादीवर घेवून व त्यांची दरवाढ केली आहे. तत्पुर्वी शासकीय नियमाप्रमाणे त्रुटीपत्र देणे गरजेचे असतांना त्यांनी तसे केले नाही. अमरावती जिल्ह्यात शेकडो वृत्तपत्रांना सरकारी यादीवर घेतले/दरवाढ केली परंतू अकोल्यात मात्र दुजाभाव करून पत्रकारांवर अन्याय केला आहे. जिल्हा माहीती अधिकारी पत्रकाराशी निट वागत नाही, शासकीय स्तरावरील बातम्या आमच्या मेलवर टाकत नव्हते, मंत्री, पालकमंत्री दौर्‍यावर आले असता बातम्या देण्यास टाळाटाळ करतात, पत्रकाराचा पदोपदी अपमान करतात, तुम्ही कसे यादीवर येता अशा यापुर्वी धमक्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत.

आकस बुद्धीने आम्ही यादीवर येऊच नये तसेच ज्यांची भाववाढ झाली त्यांचे बरोबरीचे किंवा त्यांचेही पेक्षा जास्त दस्तऐवज असतांना आमची दरवाढही त्यांनी रोखली आहे. त्यामुळे आमचे फार नुकसान केलेले आहे. पहिलेच या कोरोना महामारीने आम्हा पत्रकारांवर उपासमारीची पाळी आली आहे व वरून जिल्हा माहीती अधिकारी यांनी आमचेवर अन्याय केलेला आहे. आमचे जीवन जगणे कठिण होऊन गेले आहे. तरी या भ्रष्टाचारी मिलींद दुसाने यांची चौकशी करण्यात यावी व त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी. असे न झाल्यास नाईलाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ सप्टेंबर २०२० पासून आमरण उपोषणास बसण्याचा ईशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देतांना संतोष धरमकर, दिपक सिरसाट, पंजाबराव वर, विमल जैन, फुलचंद मौर्य, डी.जे. वानखडे, एजाज अहेमद खान, रवीकुमार वानरे, सागर लोडम आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या