हिंगोली: विविध संघटनेच्या तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

१५० तरुणांनी जाहीर प्रवेश घेतल्याने पक्षाला आणखी बळकटी....

डीएम रिपोर्ट्स- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जातीवीरहित सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास ठेऊन आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी सुमारे १५० कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश घेतला.

प्रवेश घेणार्‍यांमध्ये हिंगोली शहरातील स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष आनंद खिल्लारे, ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सचिन तपासे, विजय बनसोडे, समीरराज बेलदार, लखनभाऊ खंदारे, राहुल शेवाळे, प्रमोद जोंधळे, प्रकाश पठाडे, रघुवीरसिंह शेट्टी महाराज या विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांना समावेश आहे. या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या सुमारे १५० पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत आज प्रवेश घेतला आहे.

वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, जिल्हामहासचिव रविंद्रभाऊ वाढे, जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर, जिल्हा उपाध्यक्ष रघुवीर हनवते, जिल्हा प्रवक्ते रूपेश कदम, युवा नेते योगेश नरवाडे, माजी शहर अध्यक्ष अतीखुर रहेमान, रतन लोणकर, प्रकाश गव्हाणे, रमेश भुजबळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबन भूक्तर, सम्यक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बाराहाते, प्रल्हाद धाबे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना, जिल्हाध्यक्ष धोत्रे यांनी संगितले, की आगामी काळात जिल्ह्यात युवकांचे तगडे संघटन निर्माण करण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समतामुलक समाज निर्माण करण्याचे काम वंचित आघाडी करणार आहे.

तर वंचित बहुजन आघाडीत आज झालेल्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार असून, भविष्यात पक्षाचे संघटन वाढणार आहे. यावेळी पक्षात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी, वंचित आघाडीसाठी जीवाचे रान करून पक्ष वाढविण्याचा मनोदय व्यक्त केला.


The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने