तर हा इस्लामी देश उध्वस्त होण्याची भीती This Islamic Country Is On Verge Of Ruin

Out of 8 crores, 25 million people are infected with Corona

DM reports
Tehran (July 18) - Corona disease has swept the world. But in Iran, the disease has made its mark so strong that if the Covid-19 drug is not made available soon, the whole country is likely to be devastated. Because, out of the 80 million people in this country, 31 percent or 25 million people have contracted the disease.
According to Reuters- a famous news agency, Iranian President Hassan Rouhani made the announcement on TV today. As many as 2 lakh 71 thousand 606 positive patients were found in the country in a single day on Saturday, Rouhani said. Speaking on the occasion, Rouhani further expressed fears that another 35 million people in Iran could become corona positive. Due to this situation, concerns are also being raised internationally. The eruption took place in January and February in Iran, which has a population of 80 million. The relaxation in the lockdown has created a similar situation on the head even now. The country has also suffered a major financial setback following the announcement of the lockdown.

८ कोटी पैकी तब्बल २ कोटी ५० लाख लोकांना कोरोना रोगाची लागण

कोरोना रोगाने अख्खे जग व्यापले आहेच. परंतू इराण देशामध्ये या रोगाने आपली पाळेमुळे अशी काही घट्ट केली आहेत, की या रोगावरील औषध वेळेत बाजारात आले नाही, तर संपूर्ण देशच उध्वस्त होतो की काय अशी भीती निर्माण होत आहे. या देशातील ८ कोटी लोक संख्येपैकी तब्बल ३१ टक्के म्हणजेच २ कोटी ५० लाख लोकांना या आजाराने कवेत घेतले आहे. याबाबत प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय न्यूज एजेंशी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या देशाचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी आज टिव्हीवर ही माहिती दिली आहे. आज शनिवारी या देशात एकाच दिवसात तब्बल २ लाख ७१ हजार ६०६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती रुहानी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना रुहानी यांनी पुढे अशीही भीती व्यक्त केली, की इराणमध्ये आणखी ३ कोटी ५० लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ८ कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तिथे उद्रेक झाला होता. लॉकडाऊन मध्ये शिथिलता डोक्यावर आत्ताही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यावर या देशालाही मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने