मुकेश अंबानी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी; वॉरेन बफेट यांना मागे टाकल

डीएम रिपोर्ट्स-  २० जूनला फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९ व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी हे आता ७ व्या स्थानी पोहचले आहेत. या यादीत पहिल्या १० मध्ये असणारे ते एकमेव आशियायी उद्योजक ठरले आहेत.
याबाबत ब्लुमबर्ग या संकेतस्थळाने फोर्ब्स च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वॉरन बफेट यांनी त्यांची २.९ अब्ज डॉलर्स संपत्ती दान केली असल्याने त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. तसेच रिलायन्सचे शेअर्स मूल्य लॉकडाउनमध्येही झाले दुप्पट झाले असल्याने अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ब्लुमबर्ग आणि फोर्ब्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती आता सुमारे ७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या संपत्ती बरोबरच भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे मुकेश अंबानी यांचा जगातील १० सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आता समावेश झाला आहे. बफेट यांची एकूण संपत्ती ६७.९ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आणि शेअर्स ट्रेडर, गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनाही मागे टाकले. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिल्या दहामध्ये त्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये ते एकमेवर आशियाई उद्योजक ठरले असून आशिया काढतील खंडातील सर्वात मोठे उद्योजक ठरले आहेत.

रिलायन्सच्या डिजिटल उद्योगात १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली असल्याने अंबानी यांच्या कंपनीचे मूल्य वाढले आहे. फेसबुक, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांनी रिलायन्समध्ये १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर या आठवड्यात बीपी पीएलसी या कंपनीने १ अब्ज डॉलरची गुंतवणूक रिलायन्सच्या इंधन व्यवसायात केली आहे.

करोनाच्या महामारीमुळे जगात सर्वत्र लॉकडाऊन असताना बहुतांश देशांची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली आहे. असे असतानाही उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी कोरोना महामारीचे हे वर्ष सुद्धा लाभदायक ठरेल असल्यामुळे ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. लॉकडाउनमध्येही मार्चपासून आत्तापर्यंत रिलायन्स शेअर्समध्ये दुप्पट वाढ झाली असतानाच गेल्या २० दिवसात ५.४ अब्ज डॉलरची वाढ झाली दुप्पट असल्याने मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली आहे. वॉरेन बफेट, गुगल कंपनीचे लॅरी पेज यांना मागे टाकत मुकेश अंबानी आशियाचे बिझिनेस टायकून बनले आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने