अमेरिकेतही ॲट्रॉसिटीचा गुन्हा Caste Discrination In California USA

भारतातील ब्राह्मणवाद पोहचला सातासमुद्रा पार
California Accuses Cisco of Job Discrimination Based on Indian Employee's Caste

डीएम रिपोर्ट्स- ब्राह्मण जातीवाद आणि त्यामुळे अनेकांचे अख्खे आयुष्य बरबाद झाल्याची जिवंत उदाहरणे आजच्या सायबर युगातही भारतात आहेत. परंतु उदारमतवादाचा झेंडा विश्वभर फडकविलेल्या अमेरिकेतही ब्राह्मणवाद तेथील भारतीय मूळ असलेल्या मागास जातींच्या लोकांचा छळ करत असल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली असून याबाबत कॅलिफोर्निया रोजगार नियामक मंडळाने स्वतःहून दखल घेत ज्या कंपनीत जाती भेदभावाचा प्रकार घडला त्या सिस्को कंपनीच्या विरोधात सॅन जोस फेडरल कोर्टात भारतातील अट्रॉसिटीसारखा दावा ठोकला आहे.
संग्रहित छायाचित्र.... 
याबाबत अमेरिकन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ पासून सॅन जोस येथील सिस्को कंपनीत मुख्य अभियंता या अत्यंत मोठ्या पदावर काम करणाऱ्या अनुसूचित जाती (दलित) व्यक्तीने त्याच्या बाबतीत जातीय भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत त्या व्यक्तीने सिस्को कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभाग प्रमुखांकडे तशी तक्रार सुद्धा केली. परंतु या कंपनीच्या मनुष्यबळ विभागातही ब्राह्मण जातीचे अनेक वरिष्ठ अधिकारी असल्याने या तक्रारीची दखल घेण्याऐवजी सदर व्यक्तीचा छळ सुरूच राहिला. उलट त्याला दोन प्रोमोशन देण्यात आले नाहीत आणि त्याची बदलीही इतर ठिकाणी करण्यात आली. शेवटी याबाबत कॅलिफोर्निया रोजागर नियामक मंडळाने पीडित व्यक्तीच्या तक्रारीची स्वतः दखल घेऊन सिस्को कंपनीच्या विरोधात सॅन जोस येथील फेडरल न्यायालायत दावा दाखल केला आहे.


अमेरिकन कायद्यात वर्ण आणि वांशिक भेदभावाविरोधात कायदा आहे. परंतु त्या देशात जातीय भेदभाव नसल्याने, जाती भेदभावाविरोधात न्यायालयीन कारवाई कशी करायची हा प्रश्न कॅलिफोर्निया रोजागर नियामक मंडळाला पडला होता. त्यामुळे त्यांनी नायालयात दाखल केल्या दाव्यात, भारतातील भेदभाव कसा आहे, याबाबत विस्तृत विवेचन केले आहे. भारतातील भेदभाव हा जातीय स्वरूपात असून, ब्राह्मण आणि इतर उच्च वर्णीय लोक दलित, मागास लोकांचा जातीय भेदभाव करीत असतात आणि त्याचेच हे अमेरिकन उदाहरण असल्याचे दाव्यात नमूद केले आहे.

M.R.P.:₹ 11,000.00
Price:₹ 8,699.00 FREE Delivery.

या घटनेत पीडित व्यक्तीचे नाव कॅलिफोर्निया रोजागर नियामक मंडळाने जाहीर केले नाही. परंतु ज्यांच्यावर जातीवादाचे आरोप झाले आहेत, ते आरोपी इंजिनिअर सुंदरअय्यर आणि रामण्णा कॉम्पेल असे असल्याची माहिती आहे. या दोन ब्राह्मण व्यक्तींमुळे एका दलित- अनुसूचित जातीच्या व्यक्तीचे आयुष्य पणाला लागले आहे. अमेरिकेतील 'इक्वालिटी लॅब' नावाच्या संस्थेने २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत राहणाऱ्या भारतातील दलित आणि इतर मागास लोकांपैकी तब्बल ६७ जणांना जातीय भेदभावाचे बळी व्हावे लागले आहे. अमेरिकेत पूर्वीपासूनच भारतातील ब्राह्मण, बनिया आणि इतर उच्च जातींचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले आहेत. त्याठिकाणी ते भारतात जसे उच्च जातीचे होते, तसेच होते. परंतु नंतरच्या काळात अनेक मागास जातींचे लोकही अमेरिकेत गेले आणि त्यामुळे तेथील प्रस्थापित झालेल्या तथाकथित सवर्ण लोकांचा जळफळाट होणे सुरु झाले. अमेरिकेत मुक्त सामाजिक जीवन असले तरी मनुवादी विचारसरणीच्या लोकांना तेथील ख्रिश्चन आणि इतर समाज जवळचा वाटतो, परंतु सात समुद्र पार करून अमेरिकेत गेलेला एखादा आपलाच मागास जातीचा भारतीय चालत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यातूनच अमेरिकेत जाती भेदभावाचे प्रकार वाढले आहेत.
Logo of Cisco Inc-where the allged discrimination took place. Image Courtesy- Google India
असल्या वाढणाऱ्या जाती भेदभावाच्या प्रकारांमुळेच अमेरिकेतील मॅसॅचूसेस्ट येथील ब्रॅंडीज विद्यापीठाने त्यांच्या नियमावलीत 'जाती आधारित भेदभाव' या भेदभावाच्या प्रकारालाही समाविष्ट केले असून आता त्या विद्यापीठात जाती भेदभाव केल्याचे आढळून आल्यास वर्ण आणि वंश भेदाच्या बाबतीत जशी कारवाई केली जाते, तशीच कारवाई करण्यात येते.

English Summary

California regulators sue Cisco over alleged caste discrimination faced by Top Level Indian-American employee

California regulators sued Cisco Systems Inc last Tuesday, accusing it of discriminating against an Indian-American employee and allowing him to be harassed by two managers because he was from a lower Indian caste than them. As the US employment law does not specifically bar caste-based discrimination, but California's Department of Fair Employment and Housing mentioned in the lawsuit that in India the discrimantion prominantly is base on the caste system and not on race, raligion or color of the person and its based on protected classes such as religion.

Though the lawsuit, filed in federal court in San Jose, does not name the alleged victim, the accused in the case are Engineers Sundar Ayyar and Ramnna Compela- both from Brahmin Community of Indian Origin. According to the suit, which accuses the two former engineering managers of harassment. The caste hierarchy was enforced in the workplace and they Brahmin Engineers had strictly adhered to the Brahmin supremacy.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने