शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पिक विमा अर्ज भरण्यास सुरु Appeal To Pay Premium Of Crop Insurance

डीएम रिपोर्ट्स- शासनाने नुकत्याच घेतलेल्या महत्वपूर्ण शासन निर्णयानुसार खरीप पिक विमा आणि रब्बी पीक विमा या दोन्ही पीकविमा या योजनांना ३ वर्षासाठी राज्यात राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून या योजनेमध्ये शेतकयांच्या फायद्याचे महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.

पूर्वी प्रत्येक वर्षासाठी पीकविमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात येत होती. मात्र आता खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकविमा योजना एकत्र राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून तेही ३ वर्षासाठी देण्यात आलेली आहे.  तब्बल ३८० पानांचा हा शासननिर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर हा शासन निर्णय कशा प्रकारे आहे आणि याच्यात कशाप्रकारे पीक विमा दोखे आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कशाप्रकारे याचे वेळापत्रक असेल याबाबत शासनाकडून महाराष्ट्रासाठी खालील प्रमाणे माहिती देण्यात अली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून राज्य शासनाचे संदर्मिय शासन निर्णय क्र . २ अन्वये राबविण्यात येत आहे . राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२० व रबी २०२०-२१ हंगामा पासुन तीन वर्षाकरीता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
प्रधानमंत्री पीक विमा योजना रक्कम तक्ता  
शासन निर्णयः केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार , विमा कंपनींची अंमलबजावणी यंत्रणा म्हणुन ३ वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे.खरीप २०२० व रबी २०२०-२१ हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खालील प्रमाणे अधिसुचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक ( Area Approach ) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे .

हे ही वाचा___ हिंगोलीत पुढील पाच दिवस कर्फ्यू (संचारबंदी), कोरोनाचे रुग्ण वाढल्याने घेण्यात आला निर्णय


१. योजनेची उद्दीष्ट्टये :
१. नैसर्गिक आपत्ती , किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक – यांना विमा संरक्षण देणे .
२. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक – यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे .
३. शेतक – यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे .
४. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे , जेणेकरुन उत्पादनातील जोखीपासून शेतक – यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा , पिकांचे विविधीकरण आणि कृषिक्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
२.योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :
१. सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिराचित पिकांसाठी असेल .
२. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे .
३. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत .
४. या योजनेअंतर्गत जिल्हयातील ज्या पिकांसाठी विमा कंपनीने वास्तवदर्शी विमा हप्ता दर ३० टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे , त्यापिकांसाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर राहणार आहे शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के , रबी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे .
५. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम व रब्बी हंगाम २०२०-२१ . खरीप हंगाम व रब्बी हंगाम २०२१-२२ . खरीप हंगाम व रब्बी हंगाम २०२२-२३ या तीन वर्षाकरिता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी ७० टक्के असा निक्षित करण्यात आला आहे .
६. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निक्षित केले जाईल . उंबरठा उत्पन्न हे संपूर्ण ३ वर्ष कालावधी करिता स्थिर असेल
७. जोखमीच्या बाबी-
योजनेअंतर्गत खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे .
७.१ ) खरीप हंगामाकरिता
७.१.१ ) यामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किया लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान                (Prevented Sowing Planting / Germination )
७.१.२ ) पिकाव्या हगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान                                          ( Mid season adversity )
७.१.३ ) पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग , वीज कोसळणे , गारपीट , वादळ , चक्रीवादळ , पूर , क्षेत्र जलमय होणे , भुस्खलन , दुष्काळ , पावसातील खंड , किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट
७.१.४ ) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ( Localized Calamities )
७.१.५ ) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपशात नुकसान ( Post Harvest Losses )
७.२ ) रबी हंगामाकरिता
७.२.१ ) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान ( Md season adversity )
७.२.२ ) पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग , वीज कोसळणे , गारपीट , वादळ , चक्रीवादळ , पूर , क्षेत्र जलमय होणे , भुस्खलन , दुष्काळ , पावसातील खंड , किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट .
७.२.३ ) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ( Localzod Calamities )
७.२.४ ) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपशात नुकसान . ( Post Harvest Losses ) शासन निर्णय क्रमांकाप्रपीवियो -२०२० / प्र.क्र .४० / ११ –
३.योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी :
या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके , गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल . सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रबी हंगामासाठी अधिसुचित केलेल्या महसुल मंडल / गंडळगट किया तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल .

पिक वर्गवारी खरीप हंगाम रब्बी हंगाम
तृणधान्य व कडधान्य पिकेभात (धान),खरीप ज्वारी , बाजरी,
नाचणी(रागी), मुग,उडीद, तुर, मका (8)
गहू (बागायत), रबी ज्वारी  (बागायत व जिरायत ), हरभरा, उन्हाळी भात. (4)
गळीत धान्य पिकेभुईमुग, कारळे, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन (5)उन्हाळी भुईमुग
नगदी पिकेकापुस, खरीप कांदा.(2)रबी कांदा
राज्यात अधिसूचित क्षेत्रासाठी उन्हाळी भात पिके  अधिसूचित करण्यात आले असून यासाठी उंबरठा उत्तपन व
चालु वर्षचे सरासरी उत्पन्न हे तांदुळ ग्रहीत धरुन निचित केले आहे
जिल्हे समुह क्रमांकसमाविष्ट जिल्हे नियुक्त केलेली विमा कंपनी 
अहमदनगर, नाशिक,चंद्रपूरभारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं . लि.
सोलापूर, जळगाव, साताराभारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं . लि.
3परभणी, वर्धा , नागपूररिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं . लि.
जालना, गोंदिया, कोल्हापूररिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं . लि.
नांदेड , ठाणे, रत्नागिरी, सिंदुदुर्गइफ्को टोकियो जनरल इंन्शुरन्स कं . लि.
औरंगाबाद, भंडारा , पालघर, रायगडHDFC इगो इंन्शुरन्स कं .लि.
वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबाररिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं . लि.
हिंगोली, अकोला, धुळे, पुणेHDFC इगो इंन्शुरन्स कं .लि.
यवतमाळ , अमरावती , गडचिरोलीइफ्को टोकियो जनरल इंन्शुरन्स कं . लि.
१०उस्मानाबादबजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं .वल.
११लातुरभारतीय कृषी विमा कंपनी
१२बीडनिवेदन प्रक्रिया सुरू आहे.
वरील प्रमाणे संबंधित जिल्ह्यांसाठी त्या त्या विमा कंपन्यांना पीक विमा उतरवून शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या