कळमनुरी-नांदेड रस्त्यावर दोन अपघातात दोन ठार, दोन गंभीर Two Killed In Separate Accidents In Kalamanuri

अफरोज अली
डीएम रिपोर्ट्स/कळमनुरी- नांदेड रस्त्यावर कळमनुरी जवळील मोरवाडी जवळ झालेल्या अपघातात एक तर कामठा फाट्यावर झालेल्या अपघातात एक असे दोघे ठार झाले असून दोन्ही अपघातांमध्ये एका महिलेसह ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही पुढील उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कामठा फाटा शिवारात झालेल्या अपघातात एक ठार 

आखाडा बाळापूर- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर ते कळमनुरी मार्गावर कामठा फाटा शिवारामध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. सोमवारी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात घडला असून जखमी महिलेला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे
कळमनुरी मार्गावर कामठा फाटा शिवारामध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धापूर तालुक्यातील लहान येथील राजकुमार मारुती कुऱ्हाडे व त्यांच्या पत्नी चंचलबाई राजकुमार कुऱ्हाडे हे दोघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर (क्र. एम. एच. २६ जे. ३०८९) वाशिम येथे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कामठा फाटा शिवारात आले असताना कळमनुरी येथून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये राजकुमार कुराडे ( वय ५२ ) हे ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी चंचलबाई कुराडे (वय- ४५) या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे  व भरत देसाई येलकी येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या चांचलबाई कुऱ्हाडे यांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले. या अपघातानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. मात्र लोकांच्या भीतीपायी ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावर मयत कुऱ्हाडे  यांच्या पिशवीमध्ये आहेरासाठी नवीन कपडे, भाजीपाला व इतर साहित्य असल्यामुळे ते दोघेही वाशिम येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असावे, अशी शक्यता आखाडाबाळापुर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोरवाडीजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, दोन गंभीर जखमी

कळमनुरी- नांदेड महामार्गावरील मोरवाडी जवळ दोन ट्रकची आपसात धडक होवून ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाशिम रुग्णालयात पाठवण्यात आले.
कळमनुरी जवळील मोरवाडी येथे झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की मध्यरात्री सुमारास १ ते २ च्या वेळी एमएच ३७ डब्ल्यू ०७५१ या क्रमांकाचा ट्रक नांदेड़कड़े जात असताना समोरून येणाऱ्या टीएस ०७ यूजी ००८३ या ट्रकशी जोरदार धड़क झाली. त्यामध्ये डब्ल्यू ०७५१ चा चालक अब्दुल फारुख अ. रशीद (वय- २८ वर्ष, रा. कारंजा लाड़, जिल्हा वाशिम) हा जागीच ठार झाला. तर त्याचा क्लिनर जय विकास पाठशाळे हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाशिम रुग्णालयात पाठवण्यात आले. तर ००८३ चा ट्रक चालक रामबापु पाल जखमी झाला असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोनि रणजीत भोईटे, पोहेकॉ रिठ्ठे, स. अली, शिवाजी पवार यांच्यासह रुग्णवाहन चालक अप्पाराव भगवान, कऱ्हाळे तात्काळ घटनास्थळी पोहचुन बचावकार्य केले. त्यानंतर जखमींना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळतात नंदकिशोर तोष्णीवाल, समाजिक कार्यकर्ता शमशेर अली खान, नगरसेवक नाजिम रजवी, मनसे शहर अध्यक्ष सादेख पठाण, वसीम पठाण, प्रमोद साकळे, आदींनी मदतकार्य केले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने